परभणी : गळा आवळून पत्नीचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:08 AM2019-02-14T00:08:10+5:302019-02-14T00:08:41+5:30

मानलेल्या आईचा सासऱ्याने खून केल्याचा बदला म्हणून एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील हडको भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली.

Parbhani: Wicked wife's wife murdered | परभणी : गळा आवळून पत्नीचा केला खून

परभणी : गळा आवळून पत्नीचा केला खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मानलेल्या आईचा सासऱ्याने खून केल्याचा बदला म्हणून एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील हडको भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी- परभणीतील पंचशीलनगर भागातील मयुरी चंद्रकांत वाकोडे (१९) या तरुणीस १७ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपी आनंदा खंदारे (२२) याने पळवून नेले होते. या प्रकरणी त्याच दिवशी कोतवाली पोलीस ठाण्यात आनंदा खंदारे याच्या विरोधात मयुरीची आई संगिता वाकोडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. मुलीला पळवून नेल्याचा राग तिचे वडील चंद्रकांत वाकोडे यांच्या मनात होता. या रागातून १८ नोव्हेंबर २०१७ रोजी चंद्रकांत वाकोडे यांनी आनंदाची मानलेली आई गयाबाई खंदारे यांचा चाकूने भोसकून खून केला होता. याचा राग आरोपी आनंदा खंदारे याच्या मनात होता. या प्रकरणी चंद्रकांत खंदारे यांना पोलिसांनी अटक करुन त्यांची जेलमध्ये रवानगी केली. याच प्रकरणात मयुरी वाकोडे हिची आई संगिताबाई हिलाही पोलिसांनी अटक केली होती. सहा महिन्यांपूर्वी संगिताबाई या जामिनावर सुटल्या होत्या. दरम्यानच्या काळात आनंदा आणि मयुरी हे सहा महिन्यांपूर्वी शहरातील हडको भागातील अजिंठानगर भागात राहण्यास आले होते. ते एकत्र राहत होते. यावेळी आनंदा हा मयुरीला त्रास देत होता. त्याच्या मनात त्याच्या आईचा मयुरीच्या वडिलांनी खून केल्याचा राग कायम होता. याच वादातून मंगळवारी रात्री आरोपी आनंदा याने मयुरी खंदारे हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो फरार झाला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. तपासाअंती आरोपी आनंदा खंदारे फरार असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी संगिताबाई वाकोडे यांच्या फिर्यादीवरुन आनंदा खंदारे याच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर हे करीत आहेत.
दरम्यान, आरोपी आनंदा खंदारे हा पत्नीचा खून करुन पूर्णा- हैदराबाद रेल्वेने उदगीरपर्यंत गेला. उदगीरमध्ये उतरुन तो परत पूर्णा येथे जाण्यासाठी रेल्वेत बसला. नानलपेठ पोलिसांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याला परभणी स्थानकावर पॅसेंजर रेल्वेच्या डब्यातून नानलपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली.

Web Title: Parbhani: Wicked wife's wife murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.