परभणी शहराच्या भूमिगत गटार योजनेसाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:23 AM2021-08-19T04:23:17+5:302021-08-19T04:23:17+5:30

शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयात भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेअंतर्गत वकील, व्यापारी, सीए, डॉक्टर्स आदींच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

Parbhani will follow up for the city's underground sewerage scheme | परभणी शहराच्या भूमिगत गटार योजनेसाठी पाठपुरावा करणार

परभणी शहराच्या भूमिगत गटार योजनेसाठी पाठपुरावा करणार

Next

शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयात भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेअंतर्गत वकील, व्यापारी, सीए, डॉक्टर्स आदींच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री कराड बोलत होते. व्यासपीठावर आ. मेघना बोर्डीकर, भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, यात्रेचे मराठवाडा संयोजक मनोज पांगरकर, माजी आ. गोविंद केंद्रे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत हाके, कर सल्लागार राजकुमार भामरे, जिल्हा सरकारी वकील ॲड. ज्ञानोबा दराडे, सीए असोसिएशनचे श्याम धूत, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल कान्हे आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविकात बोलताना भाजपा महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, शहरात सीसीआयचे बंद झालेले केंद्र पूर्ववत सुरू करावे तसेच शहरातील भूमिगत गटार योजनेस मंजुरी देण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, परभणी महानगरपालिकेची स्थिती खराब असल्याचे समजले. मनपात असाच गोंधळ असतो. महापौर व आयुक्त यांच्यात चांगला समन्वय असेल तर चांगले काम होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी परभणीला १६० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना दिली. आताचे सरकार मात्र विरोधकांसोबत भेदभाव करीत आहे. मनपा कोणाचीही असली तरी जनतेशी आम्ही बांधिल आहोत. त्यामुळे परभणी शहरातील भूमिगत गटार योजना अमृतमधून मंजूर करण्यासाठी प्रस्ताव आल्यास निश्चितच मदत करू, त्यासाठी पाठपुरावाही करू, असेही कराड म्हणाले.

परभणीचाच मंत्री समजून प्रश्न सोडवणार

परभणीला मंत्रीपद नाही, याची जाण आहे. त्यामुळे परभणीचाच मंत्री समजून या जिल्ह्याचे प्रश्न सोडविणार आहे. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी आपले बोलणे झाले आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Parbhani will follow up for the city's underground sewerage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.