परभणी : कोल्हापूरचा पहेलवान संतोष दोरवड ठरला विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:42 AM2019-02-04T00:42:58+5:302019-02-04T00:47:57+5:30
प्रा़अशोकराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने येथे आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर येथील मल्ल संतोष दोरवड याने सोलापूरचा मल्ल समाधान पाटील याला चित करून राज्यस्तरावरील खुल्या गटात परभणी चषक किताबाचा मान मिळविला़ विजेत्या संतोष दोरवड याला १ लाख ५१ हजार रुपये रोख, बुलेट मोटारसायकल, एक किलो चांदीची गदा आणि परभणी चषकाचा किताब मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी (परभणी): प्रा़अशोकराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने येथे आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर येथील मल्ल संतोष दोरवड याने सोलापूरचा मल्ल समाधान पाटील याला चित करून राज्यस्तरावरील खुल्या गटात परभणी चषक किताबाचा मान मिळविला़ विजेत्या संतोष दोरवड याला १ लाख ५१ हजार रुपये रोख, बुलेट मोटारसायकल, एक किलो चांदीची गदा आणि परभणी चषकाचा किताब मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़
प्रा़अशोक देशमुख फाऊंडेशनचे रविराज देशमुख यांच्या पुढाकारातून येथील रावसाहेब जामकर विद्यालयाच्या मैदानावर रविवारी निकाली कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या़ या स्पर्धेत राज्यस्तरावरील उपविजेता ठरलेला हौसापूर (जि़सोलापूर) येथील राजे छत्रपती तालीमचा मल्ल समाधान पाटील यास रोख १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले़ मराठवाडा चषक किताबाचा मानकरी जालन्याचा पहेलवान विलास डोईफोडे हा ठरला़ अंतीम लढतीत विलास डोईफोडे याने लातूर येथील पहेलवान भारत कºहाड याच्यावर मात करीत हा किताब पटकावला़ त्यास होंडा युनिकॉन मोटारसायकल, गदा आणि महाराष्ट्र चषक किताब प्रदान करण्यात आला़ उपविजेत्या मल्लास ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले़ रात्री ११ वाजेपर्यंत स्पर्धा चालल्या़ स्पर्धेत राज्यातील ३०० मल्लांनी सहभाग नोंदविला़ प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभला़ आयोजकांनी उपलब्ध करून दिलेली प्रेक्षक गॅलरीही अपुरी पडल्याने इमारतीवरून आणि गाड्यांवर उभे राहून रसिकांनी स्पर्धेचा आनंद लुटला़ शंकरआण्णा पुजारी यांनी धावणे समालोचन केले़ शंकर पाटील यांनी डोक्यावर नारळ फोडण्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविले.
या स्पर्धेमध्ये ५७ किलो वजन गटात पहेलवान दयानंद सलगर (अंबाजोगाई), ६१ किलो बालाजी बुरगे (खवसपूर जि़ सोलापूर), ६५ किलो अक्षय गिराम (सोलापूर), ७० किलो बापू भरत जरे (पुणे), ७४ किलो दिशेन मोकाशे (पुणे), ७९ किलो अशिष वावरे (सोलापूर), ८६ किलो अमोल मुंडे (पाटोदा), खुला गट : मराठवाडास्तर पहेलवान विलास डोईफोडे (जालना), खुला गट राज्यस्तर पहेलवान संतोष दोरवड (शाहूपुरी तालीम कोल्हापूर) या मल्लांनी विजेतेपद पटकावले़
स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजक रविराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन जाधव, राजू मगर, आकाश लहाने, रामा देशमुख, केदार जाधव, संदेश संघई, गितेश देशमुख, सिद्धार्थ जंगले, सखाराम कुरूंदकर, श्यामराव देवकर, प्रदीप भंडे, राजेश्वर देशमुख, प्रवीण शिंदे, श्याम निर्वळ, संजय पाटील, सुधीर शिंदे, कैलास देवकर, शंकर स्वामी, संतोष सामाले, हनुमान कदम, काशीनाथ भालेराव, संजय पाटील, तालीम संघाचे सचिव तथा स्पर्धा संयोजक प्रा़ डॉ़ माधव शेजूळ, प्रा़ डॉ़ अभिजीत कंडेरे, प्रा़ भालचंद्र पवार यांनी प्रयत्न केले़