परभणी :महिलांनी केली महापुरुषांच्या विचारांची रुजवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:04 AM2018-01-17T00:04:22+5:302018-01-17T00:06:55+5:30
विविध महापुरुषांच्या विचारांची रुजवण घराघरात व्हावी, या उद्देशाने पारंपरिक प्रथेला फाटा देत येथील अॅड. शीतल विठ्ठल भिसे/ अडकिणे यांच्या पुढाकारातून महापुरुषांचे जीवनकार्य उलगडणाºया ग्रंथांचे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वाण म्हणून महिलांना वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विविध महापुरुषांच्या विचारांची रुजवण घराघरात व्हावी, या उद्देशाने पारंपरिक प्रथेला फाटा देत येथील अॅड. शीतल विठ्ठल भिसे/ अडकिणे यांच्या पुढाकारातून महापुरुषांचे जीवनकार्य उलगडणाºया ग्रंथांचे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वाण म्हणून महिलांना वितरण करण्यात आले.
१४ जानेवारी रोजी मकरसंक्रात उत्साहात साजरी करण्यात आली. मकरसंक्रांत हा महिलांचा सण असून यानिमित्ताने जिल्हाभरात हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमासाठी येणाºया महिलांना वाण म्हणून एखादी वस्तू भेट दिली जाते. परंपरेनुसार सुरु असलेली ही प्रथा आजही रुढ आहे. या संक्रातीच्या सणाचे औचित्य साधून कोल्हावाडी येथील अॅड.शीतल विठ्ठल भिसे यांनी वाण म्हणून वस्तू देण्याच्या प्रथेला फाटा देत राजमाता जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या कार्याची ओळख करुन देणाºया ग्रंथांचे वाण म्हणून वितरण केले. महिलांना पुस्तके वाटप करुन हा सण साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच अश्विनी लखन भिसे, कल्पना भिसे, सुनीता भिसे, संगीता भिसे, मंदा भिसे, मीरा भिसे, शोभा भिसे, अयोध्या धोपटे, शकुंतला भिसे, नीता भिसे, संजीवनी भिसे, कीर्ती भिसे, वंदना भिसे, राणी भिसे, रुख्मिणी भिसे, गीता भिसे, लक्ष्मी भिसे, सुनीता धोपटे आदी महिलांची उपस्थिती होती.