परभणी : ठिय्या आंदोलनात महिलांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:13 AM2018-08-30T00:13:07+5:302018-08-30T00:14:14+5:30

शहरातील तहसील कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने ३७ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच असून, २९ आॅगस्ट रोजी शहरातील सकल मराठा समाजातील महिलांनी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करून पाठिंबा दिला.

Parbhani: Women's participation in Thia agitation | परभणी : ठिय्या आंदोलनात महिलांचा सहभाग

परभणी : ठिय्या आंदोलनात महिलांचा सहभाग

Next

जिंतूर (परभणी) : शहरातील तहसील कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने ३७ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच असून, २९ आॅगस्ट रोजी शहरातील सकल मराठा समाजातील महिलांनी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करून पाठिंबा दिला.
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून जागर गोंधळ व ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करून आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु करण्यात आले होते़
दरम्यान, तहसील कार्यालयावर २४ जुलै रोजी मोर्चा काढून ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली़ ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मुंडन, राज्य सरकारचे श्राध्द तसेच शिस्तीत शहर बंद व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले; परंतु, सरकारने ठोस निर्णय घेतला नसल्याने जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता़
या आंदोलनाच्या ३७ व्या दिवशी शहरातील मराठा समाजातील महिलांनी एकत्र येत आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला़ यावेळी शहरातील अनेक महिलांची उपस्थिती होती.

Web Title: Parbhani: Women's participation in Thia agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.