परभणी : उच्च दाब योजनेतील कामे संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:52 PM2019-07-31T23:52:22+5:302019-07-31T23:52:58+5:30
पैसे भरुनही वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ६६३ कृषीपंपधारकांना उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात येणार आहे; परंतु, सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर १० महिन्यात केवळ ५५८ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित ५ महिन्यात ३ हजार कृषीपंपधारकांना वीज जोडणी देण्याची कसरत कंत्राटदारांना करावी लागणार आहे.
मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पैसे भरुनही वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ६६३ कृषीपंपधारकांना उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात येणार आहे; परंतु, सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर १० महिन्यात केवळ ५५८ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली आहे. उर्वरित ५ महिन्यात ३ हजार कृषीपंपधारकांना वीज जोडणी देण्याची कसरत कंत्राटदारांना करावी लागणार आहे.
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीपंपधारकांना उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनतून वीज कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंत्री मंडळाची मान्यताही घेतली. ज्या शेतकºयानी वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत, अशा ३ हजार ६६३ शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. २ शेतकºयांना १ किंवा एका शेतकºयाला एक रोहित्र या योजनेतून दिले जाणार आहे. यासाठी परभणी जिल्ह्याला ८६ कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले. त्यानुसार वीज वितरण कंपनीला पैसेही प्राप्त झाले. सप्टेंबर २०१८ मध्ये या कामासाठी संबंधित कंत्राटदारांना कार्यारंभ आदेशही देण्यात आला. शेतकºयांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेतून प्रत्येक लाभार्थी शेतकºयांच्या शेतामध्ये स्वतंत्र विद्युत रोहित्र उभे राहील, अशी अपेक्षा कृषीपंपधारक उराशी बाळगून आहेत; परंतु, या योजनेंतर्गत कामे करण्यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. कार्यारंभ आदेश देऊन १० महिन्यांचा कालावधी उलटला आहे; परंतु, ३ हजार ६६३ कृषीपंपधारक शेतकºयांपैकी केवळ ५५८ शेतकºयांनाच या योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१९ ची मुदत आहे; परंतु, संबंधित कंत्राटदारांची कामाची गती पाहता उर्वरित पाच महिन्यामध्ये जवळपास ३ हजार कृषीपंपधारक शेतकºयांना उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत स्वतंत्र विद्युत रोहित देण्याचे काम पूर्ण होईल का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीने पुढाकार घेत कंत्राटदारांकडून कामे करुन घ्यावीत, अशी अपेक्षा लाभार्थ्यांतून व्यक्त केली जात आहे.
दहा महिन्यानंतरही : मानवत, पाथरी निरंकच
४उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यासाठी ८६ कोटी रुपये मंजूर करुन या निधीतून ३ हजार ६६३ शेतकºयांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; परंतु, या योजनेअंतर्गत कामाचा कार्यारंभ आदेश देऊन १० महिने उलटले आहेत; परंतु, अद्यापही मानवत आणि पाथरी विभागात एकही काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे या योजनेच्या कामाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
४सोनपेठ विभागासाठी २११ कृषीपंपधारकांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ५० कामे पूर्ण झाली आहेत.
४ सेलू विभागासाठी ५२५ चे उद्दिष्ट देण्यात आले असून ३७ कामे पूर्ण झाले आहेत. पालम विभागासाठी ३०१ चे उद्दिष्ट असून २० कामे पूर्ण झाली आहेत. जिंतूर विभागासाठी १०९८ चे उद्दिष्ट असून १४२ कामे पूर्ण झाली आहेत.
४गंगाखेड विभागात ३३८ कृषीपंपधारकांना लाभ मिळणार असून १० महिने उलटले तरी केवळ ६३ शेतकºयांनाच लाभ मिळाला आहे. पूर्णा विभागासाठी ४०० शेतकºयांचे उद्दिष्ट असून ६४ शेतकºयांची कामे पूर्ण झाली आहेत.
४आघाडीवर परभणी विभाग असून या विभागात ५५२ शेतकºयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १८२ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे.
४तर मानवत विभागासाठी २३८ व पाथरी विभागासाठी ३०० कृषीपंप वीज जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे ;परंतु, अद्यापही एकही काम पूर्ण झाले नसल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ही कामे करुन घेण्यासाठी कंपनीने पुढकार घ्यावा.
कामाबाबत जिल्हा प्रशासनाकङे तक्रारी
४कृषीपंपधारकाला स्वतंत्र विद्युत रोहित्र मिळावे, यासाठी वीज वितरण कंपनीने उच्चदाब प्रणाली योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८६ कोटी रुपयांची कामे सुरु आहेत; परंतु, ही कामे देताना कंत्राटदार वेगळा व प्रत्यक्ष कामे करणारे दुसरेच असल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण होत आहे.
४त्याच बरोबर जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील काही लाभधारकांनी या योजनेच्या कामाबाबत लोकशाही दिनामध्ये तक्रारीही केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन कामाबाबतचा दर्जा सुधारावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.