परभणी : जमिनी जाऊनही मोबदला मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:12 AM2018-08-27T00:12:28+5:302018-08-27T00:13:27+5:30

पालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़

Parbhani: You can get compensation from the land | परभणी : जमिनी जाऊनही मोबदला मिळेना

परभणी : जमिनी जाऊनही मोबदला मिळेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़
पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयामुळे गोदाकाठचा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे़ मात्र अनेक शेतकºयांच्या जमिनी बॅक वाटरखाली गेल्याने शेतकरी भूमिहिन झाले आहेत़ बॅक वॉटरखाली जाणाºया जमिनीचे मोजमाप करताना पथकाने अनेक शेतकºयांचे नुकसान केले आहे़ मावेजा वाटप सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़
फरकंडा शिवारात सर्व्हे नं़ १४४ मध्ये १ हेक्टर ३१ आर जमीन आहे़ यापैकी जवळपास ८९ आर जमीन बॅक वॉटरखाली जात आहे़ या जमिनीचा मोबदला देताना केवळ ३२ आर जमीन संपादित करण्यात आली आहे़ त्यामुळे चार शेतकºयांचे प्रत्येकी ८ आरच जमिनीचे पैसे मिळाले आहेत़ परिणामी इतर शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे़
वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ जायमोक्यावर येऊन पाहणी करून नव्याने सर्व्हेक्षण करावे व तातडीने लाभार्थी शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रसाद पौळ, भगवान पौळ, विठ्ठल पौळ, प्रल्हाद पौळ आदींनी विष्णू प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे़
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मावेजा वाटपाचे प्रकरण विष्णूपुरी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून रेंगाळत ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे जमिनी जाऊनही शेतकºयांना मावेजासाठी संघर्ष करावा लागत आहे़
प्रकल्प यंत्रणेचे दुर्लक्ष : सूड उगावत असल्याची शेतकºयांची तक्रार
डिग्रस बंधाºयाचे कामकाज पाहणारे कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहे़ शेतकºयांवरील अन्याय दूर करावा, यासाठी वारंवार प्रकल्प कार्यालयाकडे लाभार्थी हेलपाटे मारत आहेत़ मात्र जाणीवपूर्वक शेतकºयांना दुर्लक्षित केले जात आहे़ पाणी सोडताना शेतकरी दरवर्षी विरोध करतात़ याचाच राग मनात धरून अधिकारी व कर्मचारी सूड उगावत असल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत़
शेतकरी राहिले वंचित
पालम तालुक्यातील आरखेड शिवारात गोदावरी व गळाटी नदीच्या काठच्या जमिनी बॅक वॉटरखाली जात आहेत़ पथकाने जमिनीची मोजणी करताना अनेक शेतकºयांना वंचित ठेवले आहे़ तर काही बोगस नावांचा चिरीमिरी घेऊन यादीत सामवेश केला आहे़ तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही़ त्यामुळे मावेजा वाटपापासून बहुतांश शेतकरी वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

Web Title: Parbhani: You can get compensation from the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.