परभणी जिल्हा परिषद: तातडीने रुजू होण्याचे दिले आदेश, दोन हजार शिक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:37 AM2018-05-26T00:37:40+5:302018-05-26T00:37:40+5:30

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील जवळपास २ हजार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या असून या शिक्षकांना रुजू होण्यासाठी तातडीने कार्यमुक्तही करण्यात आले आहे.

Parbhani Zilla Parishad: Instructions to be promptly started, exchange of two thousand teachers | परभणी जिल्हा परिषद: तातडीने रुजू होण्याचे दिले आदेश, दोन हजार शिक्षकांच्या बदल्या

परभणी जिल्हा परिषद: तातडीने रुजू होण्याचे दिले आदेश, दोन हजार शिक्षकांच्या बदल्या

Next

परभणी जिल्हा परिषद: तातडीने रुजू होण्याचे दिले आदेश
दोन हजार शिक्षकांच्या बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील जवळपास २ हजार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या असून या शिक्षकांना रुजू होण्यासाठी तातडीने कार्यमुक्तही करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून आॅनलाईन पद्धतीने सुरु आहे. शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या आदेशानुसार शाळांच्या पसंती क्रमांकानुसार संबंधित शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यातील जवळपास २ हजार शिक्षकांचा समावेश आहे. या संदर्भातील आदेश २४ व २५ मे रोजी काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेल्या शाळांवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्तही करण्यात आले आहे. विनंती बदलीसाठी आॅनलाईन पद्धतीने माहिती भरलेल्या शिक्षकांची कागदपत्रे चुकीची आढळल्यास त्यांची बदली रद्द करुन त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही या संदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी म्हटले आहे. संबंधित शिक्षक शाळेवर रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी याबाबतचा अहवाल तातडीने गटशिक्षणाधिकाºयांमार्फत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सादर करावयाचा आहे.
बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर दुसºयाच दिवशी बदलीने नियुक्ती दिलेल्या शाळेवर हजर न झालेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या संदर्भातील आदेशाद्वारे देण्यात आला आहे.
पती-पत्नी एकत्रिकरणात शिक्षकांची गैरसोय कायम
बदल्यांच्या या प्रक्रियेमध्ये पती-पत्नी एकत्रिकरण मुद्यास प्राधान्य देणे आवश्यक असताना याबाबीकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शासकीय नियमही अडचणीचे ठरत आहेत. दोन दिवसांत झालेल्या बदलीच्या प्रक्रियेमध्ये जे पती-पत्नी शिक्षक ३० कि.मी.च्या आत होते, ते ३० कि.मी.च्या बाहेर गेले आहेत. तर जे ३० कि.मी.च्या बाहेर होते, ते आता ३० कि.मी.च्या आत आले आहेत. परिणामी यापूर्वी ज्यांची गैरसोय झाली होती, त्यांची आता गैरसोय दूर झाली; परंतु, ज्यांना पूर्वीचे सोयीचे होते, त्यांची गैरसोय झाली आहे.
१६४ शिक्षक विस्थापित
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक शिक्षकाला बदल्यांसाठी २० शाळांचे पर्याय देण्यात आले होते; परंतु, त्यापैकी एकाही शाळेची निवड न केल्याने विस्थापित झालेले जिल्ह्यात १६४ शिक्षक आहेत. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६४ शिक्षक परभणी तालुक्यातील असून पूर्णा २२, पालम १४, गंगाखेड २५, सोनपेठ, पाथरी प्रत्येकी ७, मानवत ६, सेलू ५ आणि जिंतूर तालुक्यातील ४ शिक्षकांचा समावेश आहे. नियमित ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या ते शिक्षक शाळेवर रुजू झाल्यानंतर व त्यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर राहिलेल्या रिक्त जागांवर या विस्थापित शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार आहे. यासाठी ४ ते ५ दिवसांचा कालावधीही लागू शकतो. त्यामुळे हे शिक्षक अधांतरी आहेत.

Web Title: Parbhani Zilla Parishad: Instructions to be promptly started, exchange of two thousand teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.