परभणी जि़प़ सदस्याचा पं.स. मध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:46 PM2019-08-03T23:46:05+5:302019-08-03T23:46:21+5:30

तालुक्यातील ग्रामीण भागात गवंडी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे व यापूर्वी नोंदणी झालेल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून देण्यासाठी ग्रामसेवकांकडून विलंब होत असल्याच्या कारणावरून व गटविकास अधिकारी सुध्दा गवंडी कामगारांच्या समस्या ऐकून घेत नसल्याने संतप्त झालेल्या जि.प. सदस्य किशनराव भोसले यांनी ३ आॅगस्ट रोजी दुपारी पंचायत समिती कार्यालयातील सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेक करून आपला राग व्यक्त केला.

Parbhani Zip Member of Pt. Put in | परभणी जि़प़ सदस्याचा पं.स. मध्ये राडा

परभणी जि़प़ सदस्याचा पं.स. मध्ये राडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यातील ग्रामीण भागात गवंडी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र नोंदणी करणे व यापूर्वी नोंदणी झालेल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून देण्यासाठी ग्रामसेवकांकडून विलंब होत असल्याच्या कारणावरून व गटविकास अधिकारी सुध्दा गवंडी कामगारांच्या समस्या ऐकून घेत नसल्याने संतप्त झालेल्या जि.प. सदस्य किशनराव भोसले यांनी ३ आॅगस्ट रोजी दुपारी पंचायत समिती कार्यालयातील सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेक करून आपला राग व्यक्त केला.
अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना आवास योजने अंतर्गत घरकूल मंजूर करण्यासाठी व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राचे ग्रामसेवक नुतनीकरण करून देण्यासाठी अडचण निर्माण करीत असल्याने ३ आॅगस्ट रोजी गंगाखेड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सुरू असतांना ईसाद गटातील रासपाचे जिल्हा जि़प़ सदस्य किशनराव भोसले हे ग्रामसेवकाकडून गवंडी कामगारांना होत असलेली अडचण सांगण्यासाठी काही गवंडी कामगारांसह गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्याकडे पंचायत समिती कार्यालयात आले. पंचायत समितीच्या सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू असल्याने ते गटविकास अधिकारी यांच्या दालनात थांबले असताना दुपारी अंदाजे २ वाजेच्या सुमारास सभा संपल्यानंतर गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर हे त्यांना न भेटताच एका उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी निघून गेल्याने बराच वेळ त्यांची वाट पाहून संतप्त झालेल्या किशनराव भोसले यांनी प्रथम गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातील खुर्च्या आणून बाहेर फेकल्या व त्यानंतर सभापती तसेच उपसभापतींच्या दालनातील खुर्च्या बाहेर फेकून देत आपला राग व्यक्त केला.
पंचायत समिती कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेक होत असल्याची माहिती समजताच गंगाखेड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे यांनी मोठा फौजफाटा घेऊन पंचायत समिती कार्यालय गाठल्याने पंचायत समिती कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. खुर्च्यांची फेकाफेक झाल्यानंतर कार्यालयात आलेल्या गटविकास अधिकारी सुरडकर यांनी याबाबतची तक्रार द्यावी यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी पंचायत समिती कार्यालयात थांबलेले असताना वरिष्ठांशी चर्चा करून तक्रार दाखल करतो म्हणत झाल्या प्रकाराची माहिती वरिष्ठांना देतांना खुर्च्यांची फेकाफेकी करणारे किशनराव भोसले हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत त्यांनी यापूर्वी असे काही कृत्य केले नव्हते आज भावनेच्या भरात त्यांनी खुर्च्यांची फेकाफेकी केल्याचे सांगितल्याने झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करा अशा सूचना वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्याने हा अहवाल सादर करून वरिष्ठांच्या सूचनानुसार पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगत गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी कार्यवाहीचा चेंडू वरिष्ठांकडे टोलवित झालेल्या प्रकरणावर पडदा टाकल्याने पंचायत समिती परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते.
दिलगिरी व्यक्त करीत सभागृहाची माफी मागितली
४ग्रामीण भागातील माझ्या गटातील काही गवंडी कामगारांचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र नूतनीकरण करून देण्यासाठी ग्रामसेवक अडचण निर्माण करीत असल्याने याबाबत गटविकास अधिकारी सुरडकर यांच्याशी चर्चा करून यावर मार्ग काढावा व प्रमाणपत्र नूतनीकरण अभावी गवंडी कामगार शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी पंचायत समिती कार्यालयात आलो असताना समर्पक असे उत्तर न मिळाल्याने माझा राग अनावर झाला.
४भावनेच्या भरात मी खुर्च्यांची फेकाफेक केल्याचे सांगत हे पंचायत समितीत रासपाची सत्ता असल्याने हे सभागृह आमच्या पक्षाचे आहे. खुर्च्यांची फेकाफेकी झाल्यानंतर गवंडी कामगारांच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी चार दिवसांचा अवधी वाढून मिळाल्याने आज झालेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून सभागृहाची माफी मागत झालेली नुकसान भरपाई देण्याचे लेखी दिल्याचे किशनराव भोसले यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Parbhani Zip Member of Pt. Put in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.