परभणीत आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:39 AM2019-03-17T00:39:15+5:302019-03-17T00:39:19+5:30

येथील जिंतूररोडवरील वुडस् या फर्निचरच्या दुकानास आग लागल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास प्रयत्न करुन आग अटोक्यात आणली.

Parbhaniat Agni Yadava | परभणीत आगीचे तांडव

परभणीत आगीचे तांडव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिंतूररोडवरील वुडस् या फर्निचरच्या दुकानास आग लागल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास प्रयत्न करुन आग अटोक्यात आणली.
शहरातील जिंतूररोड परिसरात वुडस् हे फर्निचरचे दुकान असून या दुकानाच्या शेजारीच बालरुग्णालय आहे. शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास फर्निचरच्या दुकानातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. बघता बघता आग वाढत गेली. ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. तोपर्यंत टँकरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे गौरव देशमुख, डी.डी. कानोडे, सचिन जाधव, मदन जाधव, शंकर कुटे, संतोष राठोड, वाहनचालक इनायत, मौलाना, वसीम आदींनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. आग वाढत असाल्याने येथील बाजार समितीच्या अग्नीशमन दलास पाचारण केले. तसेच जिंतूर, पाथरी, मानवत, पूर्णा आदी ठिकाणाहून अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या. सलग पाच तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आग अटोक्यात आली. या आगीमध्ये दुकानाशेजारीच असलेली आॅईल विक्रीची दोन दुकानेही जळून खाक झाली.
रुग्णांना हलविल्याने टळला अनर्थ
वुडस् या फर्निचरच्या शेजारीच बालरुग्णालय आणि प्रसुतीगृह आहे. आगीची घटना लक्षात येताच समयसूचकता राखत या रुग्णालयातील रुग्णांना सामान्य रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. परभणी शहरातील विविध खाजगी रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. काही रुग्णांना आॅटोतून तर काहींना रुग्णवाहिकेतून तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णांमध्ये महिला आणि बालरुग्णांचा समावेश होता. रुग्णवाहिका चालक संतोष ठमके, प्रताप ठमके, शेख खाजा, बंडू लांबरे, गणेश खिल्लारे, अनिल ठमके आदी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनीही तातडीने मदतकार्य सुरु केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रुग्णालयातील काही भागाचेही आगीने नुकसान झाल्याची माहिती मिळाली..
भोगावजवळ पेटला वणवा
४जिंतूर- तालुक्यातील भोगाव जवळील जंगलामध्ये वणवा पेटल्याने अनेक झाडे आगीच्या भक्षस्थानी सापडली. आगीमुळे वन्य प्राणीही सैरवैर झाले होते.
४भोगावपासूनच जवळच असलेल्या इटोली रस्त्यावर हा वणवा पेटला. साधारणत: १० ते १२ एकर जमीन या वणव्याखाली आली आहे. या जमिनीवर सागवान, पळस, लिंब यासह इतर अनेक झाडे होती. वणवा पेटल्याने या वनातील मोर, ससे, हरण, रोही, निलगाय आदी प्राणी सैरवैर धावताना दिसून आले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वणवा पेटला त्याच्या बाजुलाच बंधारा असल्याने अनेक प्राण्यांचा या भागात वावर होता. मोरांची व अनेक प्राण्यांची घरटेही वणव्याच्या भक्षस्थानी पडली.

Web Title: Parbhaniat Agni Yadava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.