परभणीत अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:59 AM2019-02-13T00:59:43+5:302019-02-13T01:00:01+5:30

शासकीय दर्जा द्यावा आणि पेंशन लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.

Parbhaniat Jail Bharo movement of Anganwadi Sevikas | परभणीत अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

परभणीत अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शासकीय दर्जा द्यावा आणि पेंशन लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मानधन वाढविण्याची घोषणा केली होती; परंतु, अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली नसल्याने याचा निषेध करीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, तोपर्यंत १८ हजार रुपये किमान वेतन द्यावे, सेवा समाप्ती लाभ द्यावा, मानधनाच्या निम्मी रक्कम पेंशन म्हणून अदा करावी, विमा योजना लागू करुन मे महिन्याची पगारी सुटी द्यावी, आम्ब्रेला योजनेला सुधारित दर लागू करावेत आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. यावेळी अ‍ॅड.माधुरी क्षीरसागर, सीमा देशमुख, अर्चना कुलकर्णी, सुनिता धनले, रत्नमाला कदम, अश्विनी वाघमारे, निर्मला राठोड, ज्योती कुलकर्णी, ताहेरा बेगम, नजमा बेगम आदींसह अंगणवाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
‘यंत्रणा सक्षम करा’
४अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करीत असतानाच एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत यंत्रणा सक्षम करण्याची मागणी केली आहे. त्यात रिक्त जागा तात्काळ भराव्यात, प्रकल्पात काम करणारे वरिष्ठ अधिकारी व सुपरवायझर यांच्यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Parbhaniat Jail Bharo movement of Anganwadi Sevikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.