परभणीत नाभिक समाज उतरला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:10 AM2019-01-29T01:10:18+5:302019-01-29T01:10:25+5:30

सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथे झालेल्या युवतीच्या हत्येच्या घटनेचा जिल्ह्यातील नाभिक समाजबांधवांनी निषेध नोंदविला आहे़ ठिकठिकाणी मूक मोर्चे काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, यासह इतर मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या़ जिल्हाभरातील आंदोलनांचा आढावा़़़

   Parbhaniat Nabhika society was on the road | परभणीत नाभिक समाज उतरला रस्त्यावर

परभणीत नाभिक समाज उतरला रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथे झालेल्या युवतीच्या हत्येच्या घटनेचा जिल्ह्यातील नाभिक समाजबांधवांनी निषेध नोंदविला आहे़ ठिकठिकाणी मूक मोर्चे काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, यासह इतर मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या़ जिल्हाभरातील आंदोलनांचा आढावा़़़
 परभणीत नाभिक समाज बांधवांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदविला. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदने देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले असून त्यात करपेवाडी येथील घटनेचा निषेध करण्यात आला आहे. भाग्यश्री माने हिच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत द्यावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मनपाचे सभागृह नेते भगवान वाघमारे, पांडुरंग भवर, संपत सवणे, शाम साखरे, आत्माराम प्रधान, गोविंद भालेराव, प्रकाश कंठाळे, आत्माराम राऊत, संतोष जाधव, वसंत पारवे, दगडू राऊत, अंकुश पिंताबरे, केशव कंठाळे, सुब्रमण्यम समेटा, बालाजी कंठाळे, संतोष वाघमारे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत. जय जिवा मित्र मंडळानेही जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले असून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे़ निवेदनावर गंगाधर प्रधान, भालचंद्र गोरे, सचिन सोनटक्के, विष्णू गोरे, बालासाहेब वाघमारे, सर्जेराव बर्वे, सुनील भालेराव, वैजनाथ राऊत, भगवान गोरे धामणगावकर आदींची नावे आहेत.
गंगाखेड तहसीलवर धडकला मूक मोर्चा
गंगाखेड- करपेवाडी येथील विद्यार्थिनीच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्टÑ नाभिक महामंडळाच्या वतीने सोमवारी गंगाखेड तहसीलवर मूक मोर्चा काढून निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार किरण नारखेडे यांंना देण्यात आले़ शहरातील क्रांतीवीर भाई कोतवाल चौक येथून हा मोर्चा काढण्यात आला. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार किरण नारखेडे यांना सादर करण्यात आले. निवेदनावर बालासाहेब पारवे, देविदास नेजे, अशोक डमरे, पांडुरंग नेजे, संभाजी डमरे, बबन नेजे, अंकूश डमरे, दीपक पारवे, शिवा शिंदे, गोविंद कानडे, बालाजी जाधव, विष्णू नेजे, पप्पू राऊत, विष्णू डमरे, राजाभाऊ नेजे, नारायण डमरे, उमेश नेजे, ज्ञानेश्वर डमरे, नकुल डमरे, अशोक सुर्वे आदींसह नाभिक समाजबांधवांच्या स्वाक्षºया आहेत.
मानवतमध्ये घटनेचा निषेध
मानवत- करपेवाडी येथील घटनेचा मानवत येथील नाभिक समाजबांधवांनी निषेध नोंदविला आहे़ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या तालुका शाखेच्या वतीने २८ जानेवारी रोजी तहसीलदार डी़डी़ फुपाटे यांना निवेदन देण्यात आले़ या निवेदनात म्हटले आहे की, कर्पेवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या हत्ये प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करावी, न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी तज्ज्ञ वकिलाची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी तालुकाध्यक्ष विष्णूपंत वाघमारे, रतन शिंदे, वचिष्ट भाले, लक्ष्मण वाघमारे, उत्तम खटले, रामा भाले, शेखर सनवे यांच्यासह नाभिक समाजबांधव आणि नाभिक महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़
जिंतूरमध्ये मूक मोर्चा
जिंतूर- महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकाºयांनी व समाजबांधवांनी सोमवारी सकाळी ११ वाजता मूक मोर्चा काढून तहसीलदार सुरेश शेजूळ यांना निवेदन दिले़ करपेवाडी येथील अल्पवयीन तरुणीची हत्या करणाºया आरोपींना अटक करावी आणि मारेकºयांना फाशीची शिक्षा द्यावी, कुटूंबियांना पोलीस संरक्षण द्यावे, आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या़ या आंदोलनात संदीप काळे, शिवराम कंठाळे, श्यामराव मस्के, सचिन खाडे, प्रमोद सनईकर, पुरुषोत्तम कंठाळे, योगेश कंठाळे, सदाशिव पवार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
सोनपेठमध्ये मूक मोर्चा
४सोनपेठ- येथील नाभिक समाजाने सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील घटनेचा निषेध करून आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी शहरातून सोमवारी सकाळी ११ वाजता मूकमोर्चा काढला. त्यानंंतर तहसीलदारांंना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शहरातील संत सेना महाराज चौकातून सकाळी ११ वाजता मूकमोर्चास सुरुवात झाली. हा मोर्चा शहीद मुंजाभाऊ तेलभरे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने तहसील कार्यालयात पोहचला. या मोर्चामध्ये ज्ञानोबा वाघमारे, प्रल्हाद दळवे, अशोक सुरवसे, कारभारी दळवे, बालाजी मस्के, रमेश दळवे, बालाजी सुरवसे, ज्ञानेश्वर दळवे, अर्जून राऊत, किरण मस्के, भगवान राऊत, दत्ता पारवे, नरहरी सुरवसे, विष्णू मस्के, हरिभाऊ राऊत, पांडुरंग आकखाने, मदन राऊत, बाबा खाडे, सुनिल दळवे, चंद्रकांत गंगोत्रे, कृष्णा घुले, विलास पंडीत, महादेव मस्के, सीताराम आतखाने, दत्ता सुरवसे, राजेश आतखाने, रामप्रसाद दळवे यांच्यासह नाभिक समाज बांधव सहभागी झाले होते.

Web Title:    Parbhaniat Nabhika society was on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.