परभणीत शेतकºयांनी कापूस खरेदी पाडली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:49 AM2017-12-30T00:49:27+5:302017-12-30T00:50:19+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी इतर बाजार समितीच्या तुलनेत कमी भावाने कापूस खरेदी होत असल्याच्या कारणावरुन शेतकºयांनी एक तास कापूस खरेदी बंद पाडली. त्यानंतर संचालक गणेश घाटगे व बाजार समितीचे कर्मचारी यांच्या मध्यस्थीने २७५ रुपयांनी भाव वाढवून दिल्यानंतर पुन्हा खरेदी सुरु करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी इतर बाजार समितीच्या तुलनेत कमी भावाने कापूस खरेदी होत असल्याच्या कारणावरुन शेतकºयांनी एक तास कापूस खरेदी बंद पाडली. त्यानंतर संचालक गणेश घाटगे व बाजार समितीचे कर्मचारी यांच्या मध्यस्थीने २७५ रुपयांनी भाव वाढवून दिल्यानंतर पुन्हा खरेदी सुरु करण्यात आली.
परभणी बाजार समितीत गतवर्षी कापसाच्या खरेदी- विक्रीतून तब्बल २०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षीही बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १३१ गावांमधील शेतकरी आता मोंढ्यात कापूस विक्रीसाठी आणत आहेत. त्यानुसार बाजार समितीच्या मार्केट यार्डात कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे. व्यापाºयांकडून खरेदी सुरु झाल्यानंतर या ना त्या कारणाने कापूस खरेदी बंद होण्याच्या घटना घडत आहेत. कधी हमाल तर कधी व्यापारी संपावर जात असल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक अडचणीत येत आहेत. या सर्व घटनांवर तोडगा निघाल्यानंतर शुक्रवारी बाजार समितीमध्ये कापूस उत्पादकांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला. त्यानंतर व्यापाºयांकडून खरेदीला सुरूवात झाली; परंतु कापसाला कमी भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी चांगले संतापले. यावरून खरेदीदार आणि शेतकºयांमध्ये बाचाबाची झाली. मानवत, सेलू आदी बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल ५ हजार ५०० रुपये भाव मिळत असताना परभणीच्या बाजार समितीत मात्र केवळ ५ हजार रुपयांनी कापसाची खरेदी केली जात आहे, असा आरोप शेतकºयांनी करुन एक तास कापूस खरेदी बंद पाडली. त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर संचालक गणेश घाटगे व बाजार समितीच्या कर्मचाºयांनी व्यापारी व शेतकºयांमध्ये चर्चा घडवून आणली. त्यानंतर २७५ रुपये भाव वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ५ हजार रुपयांवरुन ५ हजार २७५ रुपयांनी खरेदीस सुरुवात केली. त्यानंतर कापूस खरेदी सुरळीत सुरु झाली.
बहुतांश व्यापाºयांनी खरेदीकडे फिरवली पाठ; मोजकेच व्यापारी लिलावात
परभणी बाजार समितीच्या मार्केट यार्डात कापूस खरेदी करण्यासाठी १४ खरेदीदार आहेत. यामध्ये ओंकार जिनिंग, महेश जिनिंग, दुर्गेश्वरी जिनिंग, बालाजी जिनिंग, सत्यप्रयाग जिनिंग, राज राजेश्वर जिनिंग, अरिहंत फायबर्स, दीपस्तंभ जिनिंग, व्यंकटेश जिनिंग, ओंकार क्वॉटन, सक्सेस क्वॉटन, श्री गणेश अॅग्रो आदी १४ जिनिंगची नोंदणी आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कापूस खरेदीदार व्यापाºयांनी मार्केटमधील कापूस खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. शुक्रवारी तर १४ पैकी केवळ तीनच खरेदीदारांच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरु होती. त्यामुळे परभणी बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आणलेल्या कापूस उत्पादकांची कोंडी होत आहे. त्यामुळे याकडे कृउबाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन खरेदीदार वाढवावेत, अशी मागणी कापूस उत्पादकांमधून होत आहे.
‘ई-नाम’ प्रणालीमुळे आॅनलाईन व्यवहार वाढले
४परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीची ई-नाम प्रणाली अंतर्गत निवड झाली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या मार्केट यार्डात जो माल खरेदी- विक्री केला जाईल, त्याची सर्व देयके धनादेश, आरटीजीएसच्या माध्यमातून अदा करावयाची आहेत; परंतु, बहुतांश शेतकºयांना माल विक्री केल्यानंतर नगदी स्वरुपात देयकाची गरज असते. मात्र परभणी बाजार समितीत नगदी व्यवहार करणे कठीण झाले आहे. परिणामी कापूस उत्पादक, मानवत, सेलू, बोरी, पूर्णा या बाजार समितीकडे वळत आहेत. त्यामुळे बाजार समितीत कापसाची आवक दुपट्टीने घटली आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन यावर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.