व्हीडीओ कॉन्फ्रन्समध्ये पंतप्रधानांशी संवाद न झाल्याने परभणीच्या घरकुल लाभार्थ्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:39 PM2018-06-05T13:39:24+5:302018-06-05T13:39:24+5:30

वेळेअभावी महाराष्ट्रातील लाभार्थ्यांचा पंतप्रधानांशी संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला.

Parbhani's Gharkul Beneficiaries become upset due to non-interaction with the Prime Minister in the video conferencing | व्हीडीओ कॉन्फ्रन्समध्ये पंतप्रधानांशी संवाद न झाल्याने परभणीच्या घरकुल लाभार्थ्यांचा हिरमोड

व्हीडीओ कॉन्फ्रन्समध्ये पंतप्रधानांशी संवाद न झाल्याने परभणीच्या घरकुल लाभार्थ्यांचा हिरमोड

Next
ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फ्रन्सद्वारे थेट संवाद साधणार होते.

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यातील घरकुल आवास लाभार्थी मोठ्या तयारीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र वेळेअभावी महाराष्ट्रातील लाभार्थ्यांचा पंतप्रधानांशी संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फ्रन्सद्वारे थेट संवाद साधणार होते. या संवादासाठी राज्यातून परभणी जिल्ह्याची निवड झाली. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये उत्साह होता. निवडक पंधरा लाभार्थी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘व्ही.सी. रुम’मध्ये दाखल झाले. ९.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हीडीओ कॉन्फ्रन्सद्वारे थेट लाभार्थ्यांसमोर आले. सुरुवातीला मनोगत व्यक्त केल्यानंतर पंतप्रधानांनी छत्तीसगड, मध्यप्रदेश, आसाम आणि तामिळनाडू राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. तोपर्यंत नियोजित वेळ संपल्याने व्हीडीओ कॉन्फ्रन्स आटोपती घेण्यात आली. यामुळे परभणी जिल्ह्याच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद होऊ शकला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला.

या व्हीडीओ कॉन्फ्रन्सच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका स्वतंत्र कक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लाभार्थ्यांचा थेट संवाद ऐकण्याची व्यवस्था केली होती. या ठिकाणी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे आदींसह ग्रामीण भागातील लाभार्थी उपस्थित होते. तर पंतप्रधान मोदी यांच्याशी थेट संवाद साधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एन.आय.सी. कक्षातील व्ही.डी.ओ. कॉन्फ्रन्स कक्षात व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Parbhani's Gharkul Beneficiaries become upset due to non-interaction with the Prime Minister in the video conferencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.