अचानक वाहने उचलण्याच्या प्रकाराने परभणीकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:30 AM2019-12-26T00:30:59+5:302019-12-26T00:31:23+5:30
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांनी उभ्या केलेल्या दुचाकी वाहतूक पोलिसांच्या उपरोक्ष खाजगी व्यक्तींकडून बुधवारी उचलण्याचा प्रकार घडल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून, रेल्वे पोलिसांच्या हद्दीत केलेली ही उठाठेव शहरवासियांच्या चर्चेचा विषय झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांनी उभ्या केलेल्या दुचाकी वाहतूक पोलिसांच्या उपरोक्ष खाजगी व्यक्तींकडून बुधवारी उचलण्याचा प्रकार घडल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून, रेल्वे पोलिसांच्या हद्दीत केलेली ही उठाठेव शहरवासियांच्या चर्चेचा विषय झाली आहे़
परभणी शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी दंड वसूल करून महसूल जमा करण्यावर भर दिला जात आहे़ प्रमुख ठिकाणी वाहनांची तपासणी करून कागदपत्रे नसलेल्या वाहनधारकांना दंड लावला जात असला तरी राजकीय पक्षांच्या काही वाहनधारकांना मात्र मोकळे सोडले जात आहे़ सायलसरमध्ये छेडछाड करून जोराने आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांना अभय देवून ग्रामीण भागातून आलेल्या वाहनधारकांनाच टार्गेट केले जात असल्याचा प्रकारही पहावयास मिळत आहे़ याशिवाय शहरातील नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी केल्याने ती उचलून नेवून त्यांच्याकडून दंड आकारण्याचा प्रकारही गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे़ यासाठी काही खाजगी व्यक्तींना नियुक्त करण्यात आले आहे़ या खाजगी व्यक्तींनी पोलिसांच्या नियुक्तीचा गैरफायदा घेणेही आता सुरू केले आहे़ बुधवारी सकाळी ११़३० च्या सुमारास रेल्वे आरक्षणाचे तिकीट काढण्यासाठी आलेल्या किंवा नातेवाईकांना घेण्यासाठी, सोडण्यासाठी आलेल्या वाहनधारकांनी रेल्वे स्टेशन समोरील एका बाजुला वाहने उभी केली होती़ याचवेळी वाहतूक पोलीस सोबत नसतानाही ही वाहने उचलून नेणारे कर्मचारी वाहनासह दाखल झाले व त्यांनी तातडीने उभी असलेली सर्व दुचाकी वाहने मोठ्या वाहनात टाकण्यास सुरुवात केली़ काही क्षणातच तेथील ८ ते १० दुचाकी या वाहनात टाकून हे कर्मचारी निघून गेले़ रेल्वेस्थानकातून बाहेर आलेल्या प्रवासी व नागरिकांना आपले वाहन उभे केलेल्या जागी नसल्याचे दिसून आल्याने त्यांची तारांबळ उडाली़ वाहनाबाबत शोधाशोध केली असता त्यांना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन नेल्याचे सांगण्यात आले़ प्रत्यक्षात वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी या दुचाकी घेवून जाणाºया खाजगी व्यक्तींसोबत नव्हता़ विशेष म्हणजे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात झालेली ही उठाठेव वाहनधारकांच्या चर्चेचा विषय झाली होती़ या प्रकाराबद्दल अनेक वाहनधारकांनी संतापही व्यक्त केला़
चारचाकी वाहनांना सोडून दिले
४बुधवारी रेल्वेस्थानकासमोर दुचाकी वाहनांबरोबरच चारचाकीही वाहने उभी होती; परंतु, वाहतूक पोलिसांच्या नावाखाली आलेल्या या कर्मचाºयांनी चार चाकी वाहनांना हातही लावला नाही़ फक्त दुचाकी वाहनेच उचलण्याचे उद्द्ष्टि डोळ्यासमोर ठेवले़ त्यामुळे दुचाकी चालकांना एक आणि चार चाकी वाहन चालकांना एक अशी दुजाभाव करणारी वागणूक का दिली जात आहे? असाही सवाल यावेळी दुचाकी चालकांनी उपस्थित केला़