दारू दुकानांविरुद्ध परभणीत धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:50 AM2017-11-28T00:50:40+5:302017-11-28T00:50:55+5:30

शहरातील मुख्य रस्त्यांवरील दारु दुकाने बंद करावीत, या मागणीसाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Parbhinat Dharana agitation against liquor shops | दारू दुकानांविरुद्ध परभणीत धरणे आंदोलन

दारू दुकानांविरुद्ध परभणीत धरणे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील मुख्य रस्त्यांवरील दारु दुकाने बंद करावीत, या मागणीसाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
मुख्य रस्त्यावर असलेल्या वाईन शॉप, बार आणि देशी दारुच्या दुकानांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासकीय रुग्णालयाच्या जवळच एक वाईन शॉप सुरु असून या वाईनशॉपमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच वाहतुकीची कोंडीही होते. कच्छी मार्केट, स्टेशन रोड, वसमत रोड, बसस्थानक परिसर आदी भागात असलेल्या दारू दुकानांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. महिला, मुलींना रात्री ७ वाजेनंतर या भागातून फिरणेही अवघड होते. या सर्व बाबी लक्षात घेता ही दारू दुकाने तात्काळ बंद करावीत, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष पवन कानडे, कृष्णा मसारे, गजानन पवार, गजानन जाधव आदींची नावे आहेत.

Web Title: Parbhinat Dharana agitation against liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.