परभणीत खरी काँटे की टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:45 AM2019-04-17T04:45:26+5:302019-04-17T04:45:52+5:30

परभणी मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत शिवसेनेचे विद्यमान खा. संजय उर्फ बंडू जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यातच होत आहे.

Paribhainat the real thorn of the thorn! | परभणीत खरी काँटे की टक्कर!

परभणीत खरी काँटे की टक्कर!

Next

परभणी मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत शिवसेनेचे विद्यमान खा. संजय उर्फ बंडू जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यातच होत आहे. दोघेही तगडे उमेदवार असल्याने लढतीत चुरस आहे.
>सामाजिक उपक्रमावर भर
शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत घेतलेल्या विकासात्मक निर्णयांची माहिती प्रचारसभांमधून दिली आहे़ शिवाय शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळे, आरोग्य शिबिर, दुष्काळग्रस्तांना मदत आदी उपक्रमांची माहिती देण्यावरही भर दिला़ शिवाय स्थानिक प्रश्नांवर केलेल्या आंदोलनाची आठवणही मतदारांना करून दिली आहे़
>पीकविमा हाच कळीचा मुद्दा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ५ वर्षांत घेतलेला नोटाबंदीचा निर्णय, बेरोजगारांना रोजगार देण्यात आलेले अपयश, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पीकविम्यात जिल्ह्यावर झालेला अन्याय या प्रश्नांसह ३० वर्षांपासून परभणी मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात असताना विकास झाला नसल्याचा मुद्दा, तसेच खा़ संजय जाधव यांची कार्यपद्धती हे मुद्दे प्रचारात मांडले़
>हेही उमेदवार रिंगणात
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ़ वैजनाथ फड, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार राजन क्षीरसागर यांच्यासह एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ या उमेदवारांनीही जोरदार प्रचार चालविला़ विशेषत: वंचित बहुजन आघाडीचे खान यांच्यासाठी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी पूर्णा, पाथरीत जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपवर प्रखर टीका केली़

Web Title: Paribhainat the real thorn of the thorn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.