प्रवाशी निवाऱ्या अभावी होतेय प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:22 AM2021-02-17T04:22:50+5:302021-02-17T04:22:50+5:30
तालूक्यातील अनेक गावाच्या बस थांब्यावर प्रवाशी निवारा नाही. त्यामुळे प्रवाशांना बसच्या प्रतिक्षेत उन्ह, वारा, पावसातच थांबावे लागते. तालूक्यामध्ये ४२ ...
तालूक्यातील अनेक गावाच्या बस थांब्यावर प्रवाशी निवारा नाही. त्यामुळे प्रवाशांना बसच्या प्रतिक्षेत उन्ह, वारा, पावसातच थांबावे लागते. तालूक्यामध्ये ४२ ग्रामपंचायत असुन ६० गावे आहेत. यापैकी तालूक्यातील अनेक गावाच्या बस थांब्यावर प्रवाशी निवारा उभारलेला नाही. परीणामी प्रवाशांना उन्हातच बसची वाट बघत थांबावे लागते. सोनपेठ येथे परळी, पाथरी, गंगाखेड येथून बसेस येतात. परंतु, यापैकी एकाही ठिकाणावरून येणाऱ्या बसेस वेळेवर येत नाहित. त्यामुळे प्रवाशांना तासन तास बसथांब्यावर बसची वाट बघत थांबावे लागते. काही गावे तर रोड पासुन एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहेत. तेथून प्रवाशी पायाने येवून बस थांब्यावर तासनतास थांबावे लागते. तालूक्यातील पारधवाडी, बुक्तरवाडी, उखळी यासह काही गावात अजुनही बस पोहचलेलीच नसल्यामुळे त्याठिकाणी अवैध प्रवाशी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागतो. प्रवाशांना आपला प्रवास जिव मुठीत घेऊन करावा लागतो. प्रवासी निवाऱ्या संदर्भात नागरिकामध्ये तिव्र संताप व्यक्त करत असुन तालुक्यातील ज्या -ज्या ठिकाणी बस थांबते. त्या ठिकाणी प्रवाशी निवारा उभारण्याची मागणी होत आहे.