प्रवाशांची गैरसोय कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:26 AM2021-02-23T04:26:33+5:302021-02-23T04:26:33+5:30
चौकांची दुरवस्था परभणी : शहरातील विविध भागांतील चौकांची दुरवस्था झाली आहे. ग्रॅण्ड कॉर्नर, अपना कॉर्नर, जुना मोंढा या भागातील ...
चौकांची दुरवस्था
परभणी : शहरातील विविध भागांतील चौकांची दुरवस्था झाली आहे. ग्रॅण्ड कॉर्नर, अपना कॉर्नर, जुना मोंढा या भागातील चौकांमध्ये कोणतेही सुशोभीकरण करण्यात आले नसून, सध्या तरी देखभालीअभावी या चौकांची दुरवस्था झाली आहे. मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दुभाजकाअभावी गैरसोय
परभणी : येथील वसमत रस्त्यावर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वसाहती वाढल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केवळ खानापूर फाट्यापर्यंतच दुभाजक टाकले आहे. त्यापुढे मात्र दुभाजक नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
लॉन वाळली
परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील लॉन वाळली असून, उद्यानाला अवकळा प्राप्त झाली आहे. शहरातील मुलांसाठी राजगोपालाचारी हे एकमेव उद्यान असून, या उद्यानाचीही दुरवस्था झाली आहे. तेव्हा मनपा प्रशासनाने उद्यान विकासाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.
विकासनिधी रखडला
परभणी : जिल्ह्यातील विकास कामांसाठी नियोजन समिती वगळता इतर विकास निधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे ही कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अनेक कामे अद्याप सुरू झाली नाहीत. त्यामुळे निधीसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.