पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:21+5:302020-12-24T04:16:21+5:30

परभणी : दमरे विभागाने मनमाड, अकोला, परळी या तीन मार्गावर केवळ विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या असून, प्रवासी गाड्या ...

Since passenger trains are closed | पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे

Next

परभणी : दमरे विभागाने मनमाड, अकोला, परळी या तीन मार्गावर केवळ विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या असून, प्रवासी गाड्या बंद असल्याने गोरगरीब प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा सुरू झाली खरी. परंतु, ही सेवा केवळ धनिकांसाठीच आहे की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने लांब पल्ल्याच्या आणि विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी आणि शेजारी जिल्ह्यांशी संपर्क साधण्यासाठी रेल्वेचा प्रवास खर्चिक बाब ठरत आहे . त्यामुळे सर्वसामान्य नागिरकांना या सुविधेचा कोणताही फायदा होत नसल्याचेच दिसत आहे. शेजारील जिल्ह्यातील कामांसाठी खासगी वाहनांचाच आधार प्रवाशांना घ्यावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेची सेवा केवळ श्रीमंत नागरिकांसाठीच आहे की काय? प्रश्न निर्माण झाला आहे.

पुशपूल प्रवासी गाडी बंद

नांदेड-औरंगाबाद या मार्गावर धावत असलेली पुशपूल प्रवासी रेल्वे गाडी सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीची ठरते. दररोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अनेकांना या गाडीचा आधार मिळतो. मात्र ही रेल्वेगाडी अद्यापही सुरू झाली नसल्याने गैरसोय कायम आहे.

पुशपूल प्रवासी गाडी बंद

नांदेड-औरंगाबाद या मार्गावर धावत असलेली पुशपूल प्रवासी रेल्वे गाडी सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीची ठरते. दररोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अनेकांना या गाडीचा आधार मिळतो. मात्र ही रेल्वेगाडी अद्यापही सुरू झाली नसल्याने गैरसोय कायम आहे.

गरीब प्रवाशांची होतेय फरफट

पूर्णा-परळी ही प्रवासी रेल्वे गाडी किरकोळ विक्रेत्यांसाठी महत्वपूर्ण गाडी आहे. गंगाखेड-परळी या भागातून अनेक भाजी विक्रेते, दूध, दही विक्रेत या रेल्वेने प्रवास करून परभणी, नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचून व्यवसाय करीत होते. मात्र ही गाडी बंद असल्याने या लघू विक्रेत्यांना जिल्ह्याचे ठिकाण गाठण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे विशेष रेल्वे गाड्यांचा विशेष हा दर्जा काढून घेतल्यास तिकीट दर कमी होऊ शकतात.

सुरेश नाईकवाडे, प्रवासी संघटना

Web Title: Since passenger trains are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.