सुविधा नसल्याने प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:14 AM2020-12-25T04:14:31+5:302020-12-25T04:14:31+5:30

अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा परभणी : शहरातील अपना काॅर्नर ते नानलपेठ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. ...

Passengers angry over lack of facilities | सुविधा नसल्याने प्रवासी संतप्त

सुविधा नसल्याने प्रवासी संतप्त

Next

अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा

परभणी : शहरातील अपना काॅर्नर ते नानलपेठ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवले जात आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडत आहे. त्यातच याच परिसरात रस्त्याच्या कडेलाच ऑटोरिक्षा उभे केले जातात. या अस्थायी अतिक्रमणांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.

रेल्वे मार्ग रुंदीकरणाचे काम ठप्प

परभणी : धर्माबाद ते परभणी या मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असले तरी परभणी ते मनमाड या मार्गावरील दुहेरीकरणाचे काम ठप्प पडले आहे. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामाचा सर्व्हे काही दिवसांपूर्वी पूर्ण झाला आहे. मात्र त्यानंतर पुढील प्रक्रिया ठप्प पडली आहे. या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावरील तडे ठरले धोकादायक

परभणी : येथील पारदेश्वर मंदिरापासून ते जुन्या पॉवर हाऊसपर्यंतच्या रस्त्यावर मोठे तडे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. मागील अनेक महिन्यांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. या भागातील २० ते २५ वसाहतींतील नागरिकांना जिंतूर रोडवर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.

जिल्ह्यात वाढली हळदीची लागवड

परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक लागवडीत बदल केले आहेत. हळदीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली असून, पूर्णा, परभणी या तालुक्यांमध्ये हळदीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात हळदीचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

नांदखेडा मार्गे झिरोफाटा रस्त्यावर वाढली वाहतूक

परभणी : असोला पाटी ते झिरोफाटा या भागात रस्ता निर्मितीचे काम सुरू असल्याने वाहतूक करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी या मार्गासाठी नांदखेडा-कात्नेश्वर- झिरोफाटा या मार्गाचा वापर सुरू केला आहे. या मार्गावरुन १० ते १५ कि.मी.पर्यंतचे अंतर वाढत असले तरी हा रस्ता वाहतुकी योग्य असल्याने अनेकांनी नांदेडकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर वाढविला आहे.

Web Title: Passengers angry over lack of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.