शस्त्र परवान्याचेही पॅशन; जिल्ह्यात सातशेहून अधिक परवाने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:19+5:302021-07-08T04:13:19+5:30
मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात शस्त्र बाळगणे आणि हवेत गोळीबार केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या. याच अनुषंगाने शस्त्र परवान्यांची माहिती घेतली, ...
मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात शस्त्र बाळगणे आणि हवेत गोळीबार केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या. याच अनुषंगाने शस्त्र परवान्यांची माहिती घेतली, तेव्हा तब्बल ७२२ नागरिकांनी हा परवाना घेतला असल्याचे समोर आले. परवान्यासह शस्त्र बाळगण्याचे जणू ‘पॅशन’च झाले आहे. एकीकडे परवान्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे पोलीस प्रशासनाची जबाबदारीही वाढत आहे.
अनधिकृत शस्त्रांचाही मोठा वापर...
जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून शस्त्रांचा अनधिकृत वापर वाढला आहे. दोन आठवड्यांपूर्वी बंदुकीतून हवेत गोळीबार करण्याच्या घटनेसह खंजीर, बंदुक आणि इतर धारदार शस्त्र जप्त करण्याची घटना शहरात घडली होती.
तसेच मागील आठवड्यातच सेलू शहरात पोलिसांनी जिवंत काडतूस पकडले होते. त्यामुळे अनधिकृतरीत्या जिल्ह्यात शस्त्र येत असल्याचे स्पष्ट होते.
त्यामुळे ही शस्त्रे नेमकी कोठून आणली जातात, या व्यवहारात कोणाचा सहभाग? यादृष्टीने तपासाची गरज निर्माण झाली आहे.
नियम कडक करण्याची आवश्यकता
n शस्त्र परवाने घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने परवाने देताना नियम अधिक कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
n अनावश्यक व्यक्तींना शस्त्र परवाने दिल्यास गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढू शकतात, ही बाब लक्षात घेऊन शस्त्र परवाना देण्यासाठी आणखी कडक नियम करण्याची गरज आहे.
शस्त्रांचा होऊ शकतो गैरवापर
n स्वसंरक्षणाच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून हा शस्त्रपरवाना दिला जातो. त्यासाठी परवानाधारकाची पडताळणी केली जाते.
n जिल्हाधिकारी कार्यालयातून हा परवाना दिला जातो. तर या परवान्यांची पडताळणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे.
n परवान्यांची संख्या वाढल्याने त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शस्त्र परवान्यांची नियमित पडताळणी करण्याची गरज आहे.