रुग्ण घटले मृत्यू मात्र थांबेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:46+5:302021-06-16T04:24:46+5:30
कोरोनाचा संसर्ग आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. असे असताना रुग्णांचे मृत्यू मात्र थांबत नसल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी ...
कोरोनाचा संसर्ग आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. असे असताना रुग्णांचे मृत्यू मात्र थांबत नसल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी दिवसभरात आयटीआय हॉस्पिटलमध्ये एक, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात दोन आणि खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या चार रुग्णांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
आरोग्य विभागाला ५ हजार ३७६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या ४ हजार ६३३ अहवालांमध्ये २३ आणि रॅपिड टेस्टच्या ७४३ अहवालांमध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५० हजार ४८३ झाली असून, ४८ हजार ४९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २६७ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. सध्या ७१८ रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी दिवसभरात १०३ रुग्णांना सुटी देण्यात आली.