परभणीत पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:26 AM2019-02-28T00:26:49+5:302019-02-28T00:27:18+5:30
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना हक्काच्या पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे़ राज्य शासनाच्या या धोरणाविरूद्ध २७ फेब्रुवारी रोजी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना हक्काच्या पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे़ राज्य शासनाच्या या धोरणाविरूद्ध २७ फेब्रुवारी रोजी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ या मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकºयांच्या हाती उत्पादन लागले नाही़ अशा परिस्थितीतही विमा भरपाईपासून शेतकºयांना वंचित ठेवले जात असल्याने या प्रश्नी सरकारला जाब विचारण्यासाठी दुष्काळ निवारण संघर्ष समितीने मोर्चाचे नियोजन केले होते़ बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास येथील शनिवार बाजार परिसरातून मोर्चाला प्रारंभ झाला़ नानलपेठ, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या परिसरात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले़ यावेळी कॉ़ राजन क्षीरसागर यांच्यासह संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मोर्चेकºयांना मार्गदर्शन केले़
फेब्रुवारी २०१८ मधील गारपीटग्रस्त २१२ गावांतील शेतकºयांना रबी पीक विमा अदा करावा, रबी २०१९ मधील ज्वारी व अन्य पिकांचा अग्रीम विमा अदा करावा, दुष्काळग्रस्त गावांना थकीत तूर विमा आणि कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा सरसकट विमा लागू करावा, चुकीच्या उंबरठा उत्पन्नावर आधारित केलेले बोगस पीक कापणी प्रयोग रद्द करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठविण्यात आले़