बालहृदयरोग, पाठीच्या मणक्याच्या कर्करोगाची शस्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:48 AM2021-02-20T04:48:10+5:302021-02-20T04:48:10+5:30

शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालहृदयरोग तपासणी, शस्त्रक्रिया, तिरळेपणावर तसेच बोबडेपणावर शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या येतात. यातूनच पनवेल येथील प्रसिद्ध ...

Pediatric heart disease, spinal cancer surgery | बालहृदयरोग, पाठीच्या मणक्याच्या कर्करोगाची शस्रक्रिया

बालहृदयरोग, पाठीच्या मणक्याच्या कर्करोगाची शस्रक्रिया

Next

शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालहृदयरोग तपासणी, शस्त्रक्रिया, तिरळेपणावर तसेच बोबडेपणावर शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या येतात. यातूनच पनवेल येथील प्रसिद्ध बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांनी बालहृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वी केली. मानवी हृदयात चार झडपा असतात. सामान्य ऑपरेशनदरम्यान ही झडपे अशा प्रकारे उघडतात. रक्ताचा प्रवाह योग्य दिशेने निर्देशित आणि रक्ताभिसरण व्यवस्थित करणे, हे हृदयाचे काम आहे. बालहृदयरोगामध्ये मुलांची योग्य वाढ न होणे, दम लागणे, गतिमंदता, निस्तेजता आदी लक्षणे आढळतात. डॉ. भूषण चव्हाण यांनी बालहृदयरोग ही शस्त्रक्रिया दुर्बीण मशीनद्वारे रुग्णाच्या हृदयाच्या वॉल्व्हमध्ये फुगा टाकून केली. या शस्रक्रियेसोबतच मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. श्रीपाद आंबोरे, भूलतज्ज्ञ डॉ. रवींद्र पाचलेगावकर व डॉ. धबाले यांनी मणक्यांच्या आतील गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. याबद्दल रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रफुल्ल पाटील, संचालिका डॉ. विद्याताई प्रफुल्ल पाटील यांनी डॉ. भूषण चव्हाण, डॉ.गोविंद रसाळ, भूलतज्ज्ञ डॉ. राहुल भोके, डॉ. रवींद्र पाचलेगावकर, डॉ. राहुल धबाले, पीआरओ महेंद्र उरणकर आदींचे अभिनंदन केले.

Web Title: Pediatric heart disease, spinal cancer surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.