दिव्यांग, व्याधीग्रस्तांना घरीच मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:59+5:302021-08-29T04:19:59+5:30

शहरात महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. ज्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर येणे शक्य नाही अशा दिव्यांग, व्याधीग्रस्त नागरिकांनादेखील ...

People with disabilities will get the vaccine at home | दिव्यांग, व्याधीग्रस्तांना घरीच मिळणार लस

दिव्यांग, व्याधीग्रस्तांना घरीच मिळणार लस

Next

शहरात महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. ज्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर येणे शक्य नाही अशा दिव्यांग, व्याधीग्रस्त नागरिकांनादेखील लस मिळाली पाहिजे यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. अशा नागरिकांना थेट घरोघरी जाऊन लस देण्यास सुरुवात केली आहे. ज्या घरात वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांच्या कुटुंबाने जवळच्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त पवार यांनी केले आहे. पथकामध्ये सॅम्युअल एम. एस, सय्यद इरफान, शेख रिझवान व शेख जवाद, जे.आर. ठाकूर व नीलेश जोगदंड यांचा समावेश आहे.

नोंदणी व टोकणची गरज नाही

आता आता केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीशिवाय तसेच टोकनशिवाय लस दिली जाणार आहे. लसीकरण केंद्रावर या आणि लस घ्या, अशी मोहीम सुरू करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: People with disabilities will get the vaccine at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.