पेट्रोल शंभरी पार; डिझेल शंभरच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:26 AM2021-02-23T04:26:35+5:302021-02-23T04:26:35+5:30
सोमवारी जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली. पेट्रोल ९९.१२ रुपये म्हणजेच १०० रुपये प्रतिलीटर या दराने विक्री होत आहे, तर ...
सोमवारी जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली. पेट्रोल ९९.१२ रुपये म्हणजेच १०० रुपये प्रतिलीटर या दराने विक्री होत आहे, तर डिझेल ९१.१२ रुपये म्हणजे ९२ रुपये प्रतिलीटर दराने विक्री झाले. पाॅवर पेट्रोलचे दर १०१.८९ रुपये म्हणजे १०२ रुपये प्रतिलीटर असे राहिले. विशेष म्हणजे, राज्यात परभणी जिल्ह्यातच पेट्रोलचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महाग पेट्रोलमुळे परभणी जिल्हा देशभरात चर्चेला आला आहे. त्यात आणखी भर पडत असल्याने नागरिकांतून मात्र संताप व्यक्त होत आहे.
स्वयंपाकाचा गॅसही १७५ रुपयांनी महागला
परभणी जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ६२० रुपयांना मिळणारा स्वयंपाकाचा गॅस आता ७९५ इतका झाला आहे. विशेष म्हणजे, या गॅस सिलिंडरवरील सबसिडीही मागच्या काही महिन्यांपासून जमा होत नाही. त्यामुळे महिलांचे बजेट कोलमडून गेले आहे. तीन महिन्यात एलपीजी गॅस १७५ रुपयांनी वाढला आहे.