कोविड रुग्णालय परिसरातच फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:06+5:302021-03-23T04:18:06+5:30

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन केले जात असताना, येथील आयटीआय परिसरातील हॉस्पिटलमध्ये ...

Physical distances in the vicinity of Kovid Hospital | कोविड रुग्णालय परिसरातच फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा

कोविड रुग्णालय परिसरातच फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा

Next

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन केले जात असताना, येथील आयटीआय परिसरातील हॉस्पिटलमध्ये मात्र नातेवाईकांच्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत असल्याची बाब २२ मार्च रोजी केलेल्या पाहणीत दिसून आली.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे आयटीआयमधील कोविड हॉस्पिटलमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. रुग्णालयाच्या बाहेर नातेवाईकांसह इतरांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. विशेष म्हणजे याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती असतानाही गर्दी हटविण्याबाबत किंवा फिजिकल डिस्टन्स राखण्याबाबत कुठल्याही उपाययोजना केल्या जात नव्हत्या. त्यामुळे 'दिव्याखाली अंधार' अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून आली. रुग्णालयाच्या परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी असलेल्या खिडक्यांजवळ ही गर्दी दिसून आली.

दुसरीकडे येथील अक्षदा मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये मात्र केवळ नातेवाईकांनाच प्रवेश दिला जात असल्याचे सोमवारी निदर्शनास आले.

या कोविड सेंटर परिसरात एका सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णांना जेवणाचा डबा देण्यासाठी नातेवाईकांना या केंद्रात प्रवेश दिले जात असल्याची बाब २२ मार्च रोजी केलेल्या पाहणीत दिसून आली.

सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्यासुमारास या केंद्राला भेट दिली तेव्हा या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात होता. मुख्य प्रवेशद्वारापासून किमान २० फूट अंतरावर आडवे टेबल लावले होते. त्या ठिकाणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी करून मगच त्यास आत सोडले जात असल्याचे दिसून आले.

गेटवरच केली चौकशी

अक्षदा मंगल कार्यालय सेंटरवर सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्यासुमारास प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, गेटवरच सुरक्षारक्षकाने अडविले. कोणत्या नातेवाईकाला भेटायचे आहे? काय काम आहे? अशा चौकशा केली. नंतर नातेवाईक असेल तरच केंद्रात प्रवेश मिळेल, असे सुरक्षारक्षकाने बजावले. त्यामुळे शहरातील कोविड सेंटरमध्ये आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याची बाब निदर्शनास आली.

Web Title: Physical distances in the vicinity of Kovid Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.