पिंगळी- पांढरी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:34+5:302021-03-07T04:16:34+5:30
पिंगळी : तालुक्यातील पिंगळी ते पांढरी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनधारक हैराण झाले आहेत. ...
पिंगळी : तालुक्यातील पिंगळी ते पांढरी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनधारक हैराण झाले आहेत. मागील पाच वर्षांपासून बांधकाम विभागाने कोणतीही दुरुस्ती न केल्याने हा रस्ता खड्डेमय बनला आहे.
परभणी तालुक्यातील पिंगळी ते पांढरी हा १० किमीचा रस्ता आहे. या रस्त्यावर पोरजवळा, पांढरी, परळगव्हाण, पिंगळी व ताडलिंबला ही गावे आहेत. या गावांतील ग्रामस्थांना शहर व तालुक्याचे ठिकाण गाठण्यासाठी या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. मात्र मागील काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी पाचही गावांतील ग्रामस्थांनी अनेक वेळा बांधकाम विभागाकडे केली. मात्र या विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सद्य:स्थितीत हा रस्ता रहदारीसाठी अयोग्य बनला आहे. त्यामुळे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ताडलीबला येथील सरपंच बाळासाहेब पैठणे, उपसरपंच रमेश शेरे, पोर जवळा येथील सरपंच न्यानोबा गायकवाड, उपसरपंच शिवप्रसाद लोखंडे, पांढरी येथील सरपंच ज्ञानोबा पांचाळ, उपसरपंच जगन्नाथ चव्हाण, परळगव्हाण येथील सरपंच मोतीराम शिंदे व प्रभाकर शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.