जिल्हा स्टेडियमसमोरील खड्डा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:17 AM2021-03-17T04:17:51+5:302021-03-17T04:17:51+5:30

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई परभणी : महावितरण कंपनीने वीज वसुली अभियानाअंतर्गत अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याने त्या गावांमध्ये पाणीटंचाई ...

The pit in front of the district stadium is dangerous | जिल्हा स्टेडियमसमोरील खड्डा धोकादायक

जिल्हा स्टेडियमसमोरील खड्डा धोकादायक

Next

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई

परभणी : महावितरण कंपनीने वीज वसुली अभियानाअंतर्गत अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याने त्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतात मुबलक पाणी उपलब्ध असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

बसस्थानकावर कोरोना चाचणी होईना

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. मात्र येथील बसस्थानकावर अजूनही कोरोना प्रतिबंधक चाचण्या सुरू नाहीत. त्यामुळे विविध जिल्ह्यांमधून परभणी शहरात येणारे नागरिक विनाचाचणी शहरात प्रवेश करीत आहे. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

शहरातील सिमेंट रस्त्याला तडे

परभणी : येथील पारदेश्वर मंदिरापासून जुना पाॅवर हाउसकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याला तडे गेले आहेत. रस्त्याच्या मधोमध मोठ्या भेगा पडल्याने वाहने घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

जायकवाडी कालव्याची दुरवस्था

परभणी : जिल्ह्यातून वाहणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याची दुरवस्था झाली आहे. अनेक भागात या कालव्याच्या फरश्या उखडल्या आहेत. काही ठिकाणी कालव्याचे मुख्य गेट नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. पाण्याचे पुढील आवर्तन देण्यापूर्वी कालव्याची दुरुस्ती करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हातगाड्यांचा वाहतुकीला अडथळा

परभणी : येथील आर.आर. टॉवर परिसरात रस्त्याच्या मधोमध हातगाडे उभे केले जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मध्यंतरी वाहतूक प्रशासनाने येथील हातगाडे हटविले होते; परंतु आता पुन्हा हातगाडे चालकांनी या भागात आपले बस्तान मांडले आहे. मनपाने या लघु व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास ही समस्या निकाली निघू शकते.

नाट्यगृहाच्या बांधकामाला वेग

परभणी : येथील जिल्हा स्टेडियमसमोरील बचत भवनच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहाच्या बांधकामाला वेग आला आहे. तळमजला आणि त्यावरील पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले असून, सध्या स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. याच गतीने काम सुरू झाले तर येत्या सहा ते सात महिन्यांत हे काम पूर्ण होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

सवारी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी

परभणी : रेल्वे प्रशासनाने धर्माबाद मनमाड या मार्गावर एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांमध्ये आरक्षणासह प्रवास करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्याच्या शेजारील शहरात किंवा जिल्ह्यांतर्गत रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सवारी रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: The pit in front of the district stadium is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.