सोनपेठ- मेहकर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:14 AM2020-12-25T04:14:37+5:302020-12-25T04:14:37+5:30

सोनपेठ- पाथरी- सेलू- देवगाव फाटा- मंठा- मेहकर हा नव्याने राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ...

Pits on Sonpeth-Mehkar National Highway | सोनपेठ- मेहकर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

सोनपेठ- मेहकर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

googlenewsNext

सोनपेठ- पाथरी- सेलू- देवगाव फाटा- मंठा- मेहकर हा नव्याने राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे या रस्त्याचे हस्तांतरण करण्यात आले आहे. मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यापूर्वी देखभाल व दुरुस्ती करण्यात येत होती. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर या रस्त्याची जबाबदारी आली आहे. असे असताना या विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. विटा ते गवळी पिंप्री यादरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यातून वाट काढताना वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या मुळे किरकोळ अपघाताच्या घटनाही घडत आहेत. या रस्त्यावर हा महामार्ग झाल्याचे बोर्ड उभारण्यात आले आहेत; परंतु त्या दृष्टिकोनातून काम मात्र सुरू करण्यात आलेले नाही. या विभागाचे कार्यालय लातूर येथे आहे. लातूर येथील अधिकाऱ्यांना येथे येण्यास अद्याप वेळ मिळालेला नाही. त्यामुळे या रस्त्यावरीरल खड्डे कायम आहेत. लोकप्रतिनिधींनीच आता याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीच्या अनुषंगाने सूचना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Pits on Sonpeth-Mehkar National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.