फिर्यादीत चुकीचा मजकूर घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:13 AM2021-07-02T04:13:24+5:302021-07-02T04:13:24+5:30
परभणी : सेलू शहरातील वालूर नाका येथे झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी फिर्यादीत चुकीचा मजकूर घेतला असून, आरोपींची संख्याही कमी ...
परभणी : सेलू शहरातील वालूर नाका येथे झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी फिर्यादीत चुकीचा मजकूर घेतला असून, आरोपींची संख्याही कमी केली आहे. तेव्हा या प्रकरणाचा योग्य तपास करून न्याय द्यावा, अशी मागणी रेखा पवार यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शाहू लक्ष्मणराव पवार यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाच्या तपासाविषयी १ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पती गंभीर जखमी असल्याचा फायदा घेत पोलिसांनी आरोपींशी संगनमत केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. त्याचप्रमाणे जाणून-बुजून फिर्यादीत चुकीचा मजकूर लिहिला. अकरा जणांनी मारहाण केली असताना केवळ चारच आरोपी दाखविले. तेव्हा या प्रकरणात पतीचा पुरवणी जबाब घेऊन फिर्यादीत समाविष्ट करावा व प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करावा, अशी मागणी रेखा पवार यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, आशिष वाकोडे, सुधीर साळवे, पिराजी कांबळे, कैलास पवार अर्जुन पंडित आदींनी केली आहे.