शेतरस्त्याअभावी झोडगाव येथील शेतकऱ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:18+5:302020-12-22T04:17:18+5:30
झोडगाव येथील १५६ शेतकऱ्यांच्या देऊळगावकडे जाणाऱ्या शेतरस्त्यावर जमिनी आहेत. जुन्या काळातील पाणंद रस्ता असून पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल ...
झोडगाव येथील १५६ शेतकऱ्यांच्या देऊळगावकडे जाणाऱ्या शेतरस्त्यावर जमिनी आहेत. जुन्या काळातील पाणंद रस्ता असून पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळे शेतात बैलगाडीदेखील जात नाही. परिणामी शेतमालाची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अनेक वर्षांपासून पाणंद रस्ता करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. परंतु, अद्यापही रस्ता करण्यात आला नाही. गावापासून २ कि.मी .अंतराचा हा पाणंद रस्ता आहे. शेतीची वहिती करण्यासाठी रस्त्याअभावी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत.
तर मतदानावर बहिष्कार
दोन कि.मी. अंतराचा शेतरस्ता करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा जानेवारी महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर नारायण पवार, त्र्यंबक पवार, धोंडिबा डुकरे, रामेश्वर पवार यांच्यासह ४३ कुटुंबप्रमुखांच्या स्वाक्षऱ्या आहेत.