कवितेतून समाजाचे प्रतिबिंब उमटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:26 AM2021-02-23T04:26:00+5:302021-02-23T04:26:00+5:30

ताडकळस : समाजातील प्रत्येक मनाचा वेध घेऊन लेखक, कवी आपले लिखाण करीत असतात. याच कवितांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीचे ...

Poetry reflects society | कवितेतून समाजाचे प्रतिबिंब उमटते

कवितेतून समाजाचे प्रतिबिंब उमटते

Next

ताडकळस : समाजातील प्रत्येक मनाचा वेध घेऊन लेखक, कवी आपले लिखाण करीत असतात. याच कवितांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीचे प्रतिबिंब उमटत असल्याचे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक तथा कवी महेश लांडगे यांनी केले.

पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या सत्कार कार्यक्रमाचे २१ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लांडगे बोलत होते. या प्रसंगी सरपंच गजानन अंबोरे, सपोनि विजय रामोड, संचालक नरहरी रुद्रवार, मदनराव अंबोरे, शेख शहजाद, बालाजी रुद्रवार, प्रा. अर्जुन राठोड, बी.जी. खरे यांची उपस्थिती होती. महेश लांडगे यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे. यावेळी वज्रमूठ हा काव्यसंग्रह लिहिला. या काव्यसंग्रहाचा वितरण सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यशस्वितेसाठी नंदेश घोणसीकर, सुरेश मगरे, धुराजी होनमने, त्र्यंबक खंदारे, संतोष कांबळे, नामदेव कनकुटे, राजू ननवरे, बालाजी शेंबेवाड, गौतम ससाने आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Poetry reflects society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.