मानवत येथे दुधातून झाली ११ मुला-मुलींना विषबाधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 04:33 PM2018-08-23T16:33:22+5:302018-08-23T16:34:34+5:30

तालुक्यातील उक्कलगाव येथे कच्या दुधातून १० मुली व एका मुलाला विषबाधा झाल्याची घटना आज सकाळी घडली.

Poisoning of 11 boys and girls from Milk | मानवत येथे दुधातून झाली ११ मुला-मुलींना विषबाधा 

मानवत येथे दुधातून झाली ११ मुला-मुलींना विषबाधा 

googlenewsNext

मानवत (परभणी ) : तालुक्यातील उक्कलगाव येथे कच्या दुधातून १० मुली व एका मुलाला विषबाधा झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. सर्व मुली १२ वर्षाच्या आतील असुन त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

तालुक्यातील उक्कलगाव येथील नारायण उक्कलकर यांच्या गाईने आज पहाटे तीनच्या सुमारास वासराला जन्म दिला होता. सकाळी दहाच्या सुमारास उक्कलकर यांनी गाईच्या कच्या दुधाचा खरस करुन शेजारच्या मुलानाही दिला. मुलानी खरस खाल्यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, चकरा येणे सुरु झाले. यानंतर शिवाजी उक्कलकर, नाथा पिंपळे, भारत  उक्कलकर यांनी सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यात स्नेहा संपत उक्कलकर, कांचना नारायण उक्कलकर, आरती उत्तम उक्कलकर, प्रिती उत्तम उक्कलकर, गायत्री उत्तम उक्कलकर, सरस्वती उत्तन उक्कलकर, शिवकन्या रंगनाथ गोंगे, अंजली रंगनाथ गोंगे, श्रती रंगनाथ गोंगे, संस्कृती हारीभाउ पांचाळ व समर्थ हारिभाउ पांचाळ यांचा समावेश आहे. सर्व मुलांवर वैद्यकीय अधिक्षक डॉ नरेंद्र वर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ मनिषा गुजराथी , डॉ सुषमा भदर्गे, डॉ. प्रिती दिक्षीत यांनी उपचार केले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. गुजराथी यांनी दिली.
 

Web Title: Poisoning of 11 boys and girls from Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.