भगर खाल्ल्यानंतर दोन कुटुंबातील २१ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 02:32 PM2021-07-21T14:32:22+5:302021-07-21T14:33:05+5:30

पाथरी शहरातील नामदेव नगर आणि  कानसुर येथील घटना 

Poisoning of 21 members of two families after eating Bhagar | भगर खाल्ल्यानंतर दोन कुटुंबातील २१ जणांना विषबाधा

भगर खाल्ल्यानंतर दोन कुटुंबातील २१ जणांना विषबाधा

Next

पाथरी ( परभणी ) : उपवासासाठी आणलेली भगर व शाबूदाणा यांचे मिश्रण असलेल्या पिठाची भाकर खाल्ल्यानंतर नामदेव नगर येथील एकाच कुटुंबातील 17 व्यक्तींना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी ( दि. 20 )घडली. तर तालुक्यातील कानसुर येथेही एकाचा कुटुंबातील 4 जणांना देखील भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, सर्व रुग्णांवर पाथरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत .

पाथरी शहरातील नामदेव नगर येथील एकाच कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईक यांनी बाजारातून साबुदाणा व भगर यांचे तयार पिठ आणून त्याच्या भाकरी एकादशीनिमित्त खाल्ल्या होत्या. यानंतर या कुटुंबातील काही सदस्य मजुरी कामानिमित्त मानवत तालुक्यातील सावळी सावरगाव येथे एका शेतात गेले. येथे त्यांना चक्कर, उलटी व संडासचा त्रास सुरु झाला. तसेच इकडे घरी थांबलेल्या व्यक्तींनाही चक्कर उलटी अशा तक्रारी सुरू झाल्या. सायंकाळी उशिरा हे सर्व रुग्ण खाजगी दवाखाना व त्यानंतर  ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. सर्व रुग्णांवर उपचार चालू असून उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुमंत वाघ यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील कानसुर येथेही एकाच कुटुंबातील दोन पुरुष व दोन महिला यांना भगर खाल्ल्यानंतर संध्याकाळी उशिरा चक्कर व उलटी होणे असा त्रास झाला.

नामदेव नगर येथील  रुग्ण : 
मीरा शिवा कसबे, विजयमाला भारत कसबे, कौसाबाई सुदाम कांबळे , संजीवनी केरबा गवारे, मुक्ता सुरेश कांबळे, शितल सचिन कांबळे, चंद्रकला संतोष कांबळे, समाधान केरबा गवारे, रेखा बाबासाहेब गोरे, संगिता पांडुरंग आडावे, पूजा हनुमान खंडागळे, तानाबाई वामन कांबळे, सुनिता हनुमान खंडागळे, दिपाली संतोष कांबळे 

कानसुर येथील रुग्ण : 
पदमीनबाई उत्तमराव कदम, बालासाहेब भगवान शिंदे, अरुणा बालासाहेब शिंदे व श्रीकांत बालासाहेब शिंदे

Web Title: Poisoning of 21 members of two families after eating Bhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.