शिवाजीनगरात पकडला विषारी साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:39+5:302020-12-11T04:43:39+5:30

वसमत रस्त्यावरील शिवाजीनगरातील गणपती मंदिर शेजारी बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास मनपाचे सफाई कामगार भगवान लहाने व चिमाजी उबाळे ...

Poisonous snake caught in Shivajinagar | शिवाजीनगरात पकडला विषारी साप

शिवाजीनगरात पकडला विषारी साप

Next

वसमत रस्त्यावरील शिवाजीनगरातील गणपती मंदिर शेजारी बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास मनपाचे सफाई कामगार भगवान लहाने व चिमाजी उबाळे यांना नाली साफ करते वेळी एक मोठा साप नालीजवळ दिसला. त्यांनी स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड यांना ही माहिती दिली. लक्ष्मण जोगदंड यांनी घटनास्थळी दाखल होऊन सर्पमित्र रणजित कारेगावकर यांना फोन करुन साप समोरच असल्याचे सांगितले. काही वेळातच कारेगावकर यांनी तेथे येऊन हा साप पकडला. पकडलेला साप घोणस ( परड) जातीचा असून तो अत्यंत जहाल विषारी असल्याचे कारेगावकर यांनी सांगितले. काही वेळाने या सापाला निर्जनस्थळी सोडून दिले. याकामी कारेगावकर यांना स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड, मुकादम कुणाल भारसाकळे, शेख मोहसीन यांनी सहकार्य केले.

Web Title: Poisonous snake caught in Shivajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.