अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:53+5:302021-03-16T04:17:53+5:30
नदीपात्रातील वाळूचा अवैध उपसा करून विक्री करण्याचा गोरख धंदा जिल्ह्यात सुरू असून, जिल्हा प्रशासनाचा महसूल बुडवत काळ्या बाजारात वाळूची ...
नदीपात्रातील वाळूचा अवैध उपसा करून विक्री करण्याचा गोरख धंदा जिल्ह्यात सुरू असून, जिल्हा प्रशासनाचा महसूल बुडवत काळ्या बाजारात वाळूची चढ्या दराने विक्री केली जात आहे. परभणी तालुक्यातील नांदगाव शिवारातून वाहणाऱ्या पूर्णा नदीपात्रातून अवैध मार्गाने वाळू उपसा करून एक ट्रक शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे यांच्या पथकाने सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्यासुमारास वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या बाजूला हा ट्रक पकडला. त्यात १२ हजार रुपयांची वाळू आणि ट्रक असा ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी विनोद भागवत पांडगळे (रा. नांदगाव) आणि टिप्पर मालकाविरुद्ध नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.