वृध्देच्या खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:21 AM2017-11-20T00:21:50+5:302017-11-20T00:21:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : येथील मंत्रीनगर परिसरात एका वृद्धेचा खून करणाºया आरोपी पती-पत्नीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ...

Police cell accused in old age murder case | वृध्देच्या खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

वृध्देच्या खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील मंत्रीनगर परिसरात एका वृद्धेचा खून करणाºया आरोपी पती-पत्नीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुलीस पळवून नेल्याचा राग मनात धरुन १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास गयाबाई नाथजी खंदारे या ६० वर्षीय महिलेचा चाकूचे वार करुन खून झाला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी चंद्रकांत वाकळे व त्याच्या पत्नीस पोलिसांनी अटक केली होती.
या दोन्ही आरोपींना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर उभे केले होते. न्यायालयाने आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपासणी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब डोंगरे यांनी दिली.

Web Title: Police cell accused in old age murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.