राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनापूर्वीच भाजप आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 12:47 PM2021-07-06T12:47:43+5:302021-07-06T12:50:29+5:30

Agitation of BJP : विधानसभेत भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप

Police grabbed BJP protesters before burn state governments statue | राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनापूर्वीच भाजप आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनापूर्वीच भाजप आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्देशिवाजी महाराज पुतळा परिसरात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलनराज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

परभणी : विधानसभेतील बारा आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या तयारीत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ( Agitation of BJP against state goverment on suspension of MLA )

५ जुलै रोजी विधानसभेत भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. या प्रकारामुळे शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, त्यातूनच  ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, मनपातील गटनेत्या मंगलताई मुदगलकर, मोहन कुलकर्णी, सुनील देशमुख, समीर दुधगावकर, सुरेश भुमरे, रामदास पवार, विजय गायकवाड, मोहन कुलकर्णी, दिनेश नरवाडकर, नगरसेवक मधुकर गव्हाणे, शिवाजी शेळके आदी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात एकत्र आले. राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

याचवेळी भाजप आमदारांच्या निलंबनाचा निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याची तयारी सुरू झाली. ही बाब पोलिसांना समजताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आंदोलनापासून परावृत्त केले. साधारणतः अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या धरपकडीमुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ निर्माण झाला होता. या आंदोलना दरम्यान नवामोंढा पोलिसांनी भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, सुनील देशमुख, समीर दुधगावकर यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: Police grabbed BJP protesters before burn state governments statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.