मानवतमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; नगरसेवकासह २८ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:59 PM2019-09-04T14:59:15+5:302019-09-04T15:01:41+5:30
शहरातील खंडोबा रस्त्यावर असलेल्या अमोल रेस्टॉरंटवर पोलिसांचा छापा
मानवत : शहारातील खंडोबा रस्त्यावर एका रेस्टॉरंट मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकुन एका नगरसेवकासह २८ जणावर कारवाई करीत १ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.
शहरातील खंडोबा रस्त्यावर असलेल्या अमोल रेस्टॉरंटमध्ये पैसे लावुन जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेस्टॉरंटवर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास धाड टाकली. पोलिसांना येथे झन्नामन्ना नावचा जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी २८ जणावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८० हजाराच्या रोख रक्कमेसह मोबाईल, जुगाराच्या साहित्यासह एकुण १ लाख ५५ हजार रुपायाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे स पो नि शिवाजी देवकते यांच्या फिर्यादीवरुन नगरसेवक विनोद राहाटे, जनार्धन किर्तने, दिपक भदर्गे, कैलास शिंदे, दत्ता रोडे, सुनिल पाटेकर, सुधाकर बारहाते, ओमप्रकाश चव्हाण, नवनाथ गुदटवार, शाम कुऱ्हाडे, सुंदर लेंगुळे, चक्रपाणी भक्ते, नितिन चव्हाण, शेख बाबु शेख बिसमिल्ला, आशोक धबडगे, योगेश गायकवाड, भास्कर काळे, अण्णासाहेब बारहाते, युवराज लाड, शेख समीम शेख मेहबुब, शेख मेहमुद शेख मेहबुब, आकाश चव्हाण, बालाजी आळसे, राजु बारहाते, शेख नफिक शेख रफिक, कैलास धबडगे, मनोज चव्हाण, नारायण भोरपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपो नि मुंडे करीत आहेत.