परभणी शहरात पोलिसांचे छापे :‘ड्राय डे’ दिवशी दारू विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:37 AM2018-09-14T00:37:29+5:302018-09-14T00:37:55+5:30
गणेशोत्सवाच्या दिवशी ड्राय डे असतानाही अवैधरित्या दारू विक्री करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णाकांत उपाध्याय यांनी कारवार्ईचा बडगा उगारला असून, गुरुवारी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापे टाकून हजारो रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली़ या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गणेशोत्सवाच्या दिवशी ड्राय डे असतानाही अवैधरित्या दारू विक्री करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णाकांत उपाध्याय यांनी कारवार्ईचा बडगा उगारला असून, गुरुवारी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये छापे टाकून हजारो रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली़ या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अवैध दारू विक्रीतून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. श्री गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. १३ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे आणि त्यांच्या पथकाने शहरात चार ठिकाणी छापे मारले. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. मराठवाडा प्लॉट भागात ३ हजार ५३२ रुपयांची अवैध देशी दारु जप्त केली. मुख्य आरोपी असलेल्या एका महिलेसह परसराम बाबासाहेब वाकळे (रा.संजय गांधीनगर) आणि विजय बाबासाहेब वाकळे या दोघांना ताब्यात घेतले. उस्मानिया कॉलनीतही ७ हजार ८ रुपयांची दारु जप्त करुन मुख्य आरोपी असलेल्या एका महिलेसह इस्माईल खान अब्दुल्ला खान, शेख शाहरुख शेख रशीद, शेख हाजी शेख हुसेन आणि शेख अस्लम शेख हुसेन यांना ताब्यात घेतले आहे. वांगी रोड परिसरातील हडको भागात ५७ हजार ८३६ रुपयांची दारु जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, या ठिकाणी देखील मुख्य आरोपी ही महिला असून तिच्यासह मिलिंद श्रीराम घागरमाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिंतूररोडवरील नेहरुनगरातही पहाटे टाकलेल्या छाप्यात १९ हजार १९० रुपयांची विदेशी दारु जप्त करण्यात आली. या छाप्यात राजेश मंचकराव वाघमारे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या छाप्यांमध्ये देशी दारूच्या १ हजार १९७ बाटल्या, विदेशी दारूच्या ६५ बाटल्या आणि बिअरच्या ४८ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. विशेष म्हणजे, या कारवाईत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात तीन महिलांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना नानलपेठ पोलीस ठाण्यात हजर केले असून पोलीस पुढील कारवाई करीत आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह पथकातील उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, प्रकाश कापुरे, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, कैलास कुरवारे, अनिल हिंगोले, लक्ष्मीकांत धुतराज, शरद मुलगीर, अरुण पांचाळ, दिलावर पठाण, भगवान भुसारे, किशोर भूमकर, हरि खुपसे, अजहर शेख, आशा सावंत, पोलीस मुख्यालयातील त्रिवेणी चोपडे, पवार, काठोडे, जाधव, गौतम, शेख, कांबळे आदींनी ही कारवाई केली. या धाडसत्रामुळे परभणी शहरात अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.