बेशिस्त वाहनांवर पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:25+5:302020-12-30T04:22:25+5:30

शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या ...

Police take action against unruly vehicles | बेशिस्त वाहनांवर पोलिसांनी केली कारवाई

बेशिस्त वाहनांवर पोलिसांनी केली कारवाई

Next

शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक बापूराव तडस यांच्यासह वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन काशीकर यांनी शहरातील विविध भागांमध्ये वाहनचालकांवर कारवाई केली. येथील बसस्थानक परिसर, जिंतूर रोड ते विसावा फाटा या भागात दिवसभर ही मोहीम राबविण्यात आली. वाहनांचा परवाना नसणे, ट्रिपलसीट वाहन चालविणे, विरुद्ध बाजूने वाहन चालविणे यासह नो पार्किंगच्या जागेत वाहन उभे करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन काशीकर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रचूड हत्तेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. दिवसभरात केलेली कारवाई आणि वसूल दंडाची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही.

मास्क नसणाऱ्या वाहनचालकांनाही दंड

वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मास्कचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांनाही दंड ठोठावला आहे. शहरात मागील काही दिवसांपासून मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याने वाहतूक पोलिसांनी मास्कचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल केला.

Web Title: Police take action against unruly vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.