पिंगळगड नदीवरील पुलाची दुरवस्था; वाहनधारक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:46+5:302021-07-12T04:12:46+5:30
ताडकळस - पूर्णा - नांदेड या रस्त्याचे डांबरीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे परभणीहून नांदेड गाठण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून ...
ताडकळस - पूर्णा - नांदेड या रस्त्याचे डांबरीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे परभणीहून नांदेड गाठण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याला वाहनधारक पसंती देत आहेत. मात्र, ताडकळस - पूर्णा या रस्त्यावर पिंगळगड नाल्यावर उभारण्यात आलेल्या पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलाला असलेले संरक्षक कठडे गायब झाले आहेत. त्यामुळे रात्री - अपरात्री या रस्त्यावरून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनधारकांना जीव धाेक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरून अनेक शेतकरी आपल्या बैलगाडी घेऊन शेत गाठतात. या पुलाला कठडे नसल्याने बैलगाडीही घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ताडकळस परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाची दुरुस्ती करून कठडे बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून येत आहे.