जवळा जिवाजी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:51 AM2021-01-08T04:51:54+5:302021-01-08T04:51:54+5:30
सेलू : दुधना नदीवरील मोरेगाव येथील कोल्हापूरी बंधारा पाण्याने भरला आहे. यंदा दुधना पाणी सोडल्याने बंधारा काठोकाठ भरला ...
सेलू : दुधना नदीवरील मोरेगाव येथील कोल्हापूरी बंधारा पाण्याने भरला आहे. यंदा दुधना पाणी सोडल्याने बंधारा काठोकाठ भरला आहे. त्यामुळे बंधारा परिसरातील शेतक-यांना पाणी उपलब्ध झाले आहे.
डांबरीकरणाची प्रतिक्षा
सेलू : सेलू ते देवगाव फाटा रस्त्यावरील डिग्रस पाटी ते रायगड काॅर्नर या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही दिवसापूर्वी डागडुजी करण्यात आली. मात्र अद्यापही डांबरीकरणाचे काम करण्यात नाही.
तालुक्यात अवैध वृक्षतोड वाढली
सेलू: तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध वृक्षतोड मोठया प्रमाणावर केली जात आहे. शेत शिवारातील लिंब, बाभळ आदी वाढ झालेल्या वृक्षाची कत्तल होत आहे. याकडे संबंधित विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.
वाहतुकीला शिस्त लागेना
सेलू : शहरातील मुख्य रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. त्यातच तरूण सुसाट वेगाने दुचाकी चालवत आहेत. त्यामुळे छोटे छोटे अपघात नेहमीच घडत आहेत. अल्पवयीन मुले दुचाकी चालवत पोलीस प्रशासनानेही वाहनधारकांना शिस्त लावावी अशी मागणी होत आहे.