दुरुस्तीअभावी संकुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:30 AM2020-12-03T04:30:04+5:302020-12-03T04:30:04+5:30
खेळाडूंची अनेक दिवसांची मागणी होणार पूर्ण जिल्ह्यातून अनेक गुणवंत क्रिकेट खेळाडू रणजी स्पर्धेपर्यंत पोहोचलेले आहेत. सध्याही या ठिकाणी सातत्याने ...
खेळाडूंची अनेक दिवसांची मागणी होणार पूर्ण
जिल्ह्यातून अनेक गुणवंत क्रिकेट खेळाडू रणजी स्पर्धेपर्यंत पोहोचलेले आहेत. सध्याही या ठिकाणी सातत्याने क्रिकेटचा सराव केला जातो. या खेळाडूंसाठी जिल्हा स्टेडियम मैदानावर २० लाख रुपये खर्च करुन ४० बाय ८० आकाराची टर्फ विकेट तयार केली जात आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. दोन विकेट या ठिकाणी तयार केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे लॉनही लावली जाणार आहे. ही पीच तयार करणारे तज्ज्ञ परभणीत दाखल झाले असून, कार्यकारी अभियंत्यांनीही भेट दिली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत टर्फ विकेटचे काम पूर्ण होईल. मैदानाच्या ३० मीटर यार्डात लॉन टाकण्याचे काम प्रस्तावित आहे, मात्र त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिली.
स्टेडियम मैदानात टर्फ विकेट बनविण्याचे काम हाती घेतल्याने खेळाडूंची काही दिवस गैरसोय होईल. त्यामुळे काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. शिवाय मैदानातील गवत पुन्हा वाढू नये, यासाठी मीठाच्या पाण्याची फवारणी केली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सरावाचा प्रश्न मिटेल.
नरेंद्र पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी.