विद्यापीठातील पुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:07+5:302021-02-17T04:23:07+5:30
बगिचातील झाडे वाळली परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या बगिचातील झाडे नियोजनाअभावी वाळली आहेत. या परिसरात अनेक शासकीय ...
बगिचातील झाडे वाळली
परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरात असलेल्या बगिचातील झाडे नियोजनाअभावी वाळली आहेत. या परिसरात अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. मात्र बगिचाची देखभाल दुरुस्ती कोणी करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून या बगिचाची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
नळ जोडणी देण्याची मोहीम सुरू
परभणी : शहरात नवीन नळ जोडणी देण्याची मोहीम सुरू झाली आहे. मनपा प्रशासनाने नळ जोडणीची संख्या वाढावी यासाठी मालमत्ता कर आणि पाणी करात विलंब शुल्कात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नळ जोडण्यांची संख्या या आठवड्यात वाढेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
बसस्थानकावर सुविधांचा अभावपरभणी : शहरातील बसस्थानक परिसरात सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासह पुरेशी आसन व्यवस्था या परिसरात उपलब्ध नाही. मागील काही महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरुपात बसस्थानकाचा कारभार पाहिला जातो. प्रवाशांची संख्या वाढली असून, सुविधा मात्र कमी झाल्या आहेत. एस.टी. महामंडळ प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण बसफेऱ्या सुरु करण्याची मागणी
परभणी : जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत झाले असताना ग्रामीण भागात मात्र अनेक मार्गावर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना खाजगी वाहतुकीच्या साह्याने प्रवास करावा लागत आहे. कुठे रस्ता खराब असल्याचे तर कुठे प्रवासी संख्या नसल्याचे कारण देत बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
जिल्ह्यात वाढले शेतीचे सिंचन
परभणी : यावर्षी जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत सिंचन वाढले आहे. जायकवाडी आणि दुधना प्रकल्पातून रबी हंगामात पाण्याचे तीन आवर्तन देण्यात आले आहेत. रबी हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध झाल्याने रबीचे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खड्ड्यांमुळे वाढले अपघाताचे प्रमाण
परभणी : जिल्ह्यातील तीन्ही बाजूचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. वसमत आणि गंगाखेड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या केले जात आहे. त्यामुळे एका बाजूने रस्ता खोदून ठेवला असून, वाहनधारकांना खड्डे चुकवित वाहने चालवावी लागतात. त्यातून छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.