परभणी जिल्ह्यात दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:06 AM2017-11-30T01:06:46+5:302017-11-30T01:06:55+5:30
तीन दिवसांपूर्वी रेल्वे परिसरात स्टोअर रुममधील साहित्य चोरी प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना रेल्वे सुरक्षा बलाने बुधवारी ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : तीन दिवसांपूर्वी रेल्वे परिसरात स्टोअर रुममधील साहित्य चोरी प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना रेल्वे सुरक्षा बलाने बुधवारी ताब्यात घेतले आहे.
पूर्णा येथील रेल्वे कॉलनीतील परिसरात असलेल्या स्टोअर रुममधून २६ नोव्हेंबर रोजी रेल्वेचे ५ मिक्सर ग्रँडर, ५ इमर्जन्सी लाईट, १० इलॅस्टीक रेल्वे क्लिप असा १५ हजार रुपयांचा माल चोरी झाला होता़ या प्रकरणी लिपिक रामा बुद्धे यांच्या फिर्यादीवरून रेल्वे सुरक्षा बलात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता़
या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक संजय बोरकर, कॉन्स्टेबल शेख जावेद इनामदार, मनोज कांबळे व कर्मचारी यांनी दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत साहित्य चोरले असल्याची कबुली दिली आहे़ तसेच शहरातील एका भंगार दुकानावर विक्री केल्याचेही त्यांनी यावेळी कबूल केले़