भोगाव ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा प्रस्थापितांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:58+5:302021-01-08T04:52:58+5:30
यापूर्वी १९९० ते २०१५ मध्ये एकहाती सत्ता मिळवून ३० वर्षे ग्रामपंचायतीवर सत्ता गाजविली असताना २०२१ च्या निवडणुकीत जिंतूर कृषी ...
यापूर्वी १९९० ते २०१५ मध्ये एकहाती सत्ता मिळवून ३० वर्षे ग्रामपंचायतीवर सत्ता गाजविली असताना २०२१ च्या निवडणुकीत जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृष्णकांत शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १३ पैकी ११ जागा बिनविरोध जिंकून सत्तेचा गढ कायम ठेवला आहे. वाॅर्ड क्र.१ मध्ये दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात असल्याने येथे निवडणूक होणार असून, उमेदवार सरला नानासाहेब सूर्यवंशी व नसीम शेख सुलतान, तर विरोधी गटाचे कोमल नरेंद्र देशमुख यांच्यात लढत होणार आहे. कृष्णकांत देशमुख यांच्या गटाचे अकरा उमेदवार ४ जानेवारी रोजी बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये चंद्रकांत शिवाजीराव देशमुख, शीतल चंद्रकांत देशमुख, शिल्पा गजानन देशमुख, माधव उत्तमराव देशमुख, शिवकन्या दिगांबर पुंड, सारिका गजानन नाईक, प्रकाश आबासाहेब मोरे, सहेबाबी अब्दुल रहीम, शिवकुमार वाव्हळ, नागोजी पुंजारे, महादेव शेवाळे या उमेदवारांचा समावेश आहे.