देशमुख हॉटेल भागात रात्रभर वीजपुरवठा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:14 AM2020-12-25T04:14:29+5:302020-12-25T04:14:29+5:30

वाहनतळांच्या जागेवर वाढले अतिक्रमण परभणी : शहरात बाजारपेठ भागात महानगरपालिकेने वाहनतळाची जागा निश्चित केली आहे. मात्र या पैकी बहुतांश ...

Power outage in Deshmukh Hotel area overnight | देशमुख हॉटेल भागात रात्रभर वीजपुरवठा गायब

देशमुख हॉटेल भागात रात्रभर वीजपुरवठा गायब

Next

वाहनतळांच्या जागेवर वाढले अतिक्रमण

परभणी : शहरात बाजारपेठ भागात महानगरपालिकेने वाहनतळाची जागा निश्चित केली आहे. मात्र या पैकी बहुतांश जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करुन खरेदी केली जाते. परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.

जि.प. इमारतीचे बांधकाम ठप्प

परभणी : शहरात स्टेडियम कॉम्प्लेक्स भागात जिल्हा परिषदेची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी खिडक्या, दरवाजे आणि इतर कामे शिल्लक आहेत. मागील दोन महिन्यांपासून हे काम ठप्प असून, काम पूर्ण होण्यासाठी विलंब लागत आहे. जि.प. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शिल्लक राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.

नाट्यगृहाच्या बांधकामाला शहरात गती

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील बचत भवनच्या जागेत नवीन नाट्यगृहाची इमारत बांधली जात आहे. अनलॉकच्या प्रक्रियेनंतर हे काम पुन्हा सुरु करण्यात आले असून, या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यास शहरातील कलावंतांची मोठी अडचण दूर होणार आहे.

मास्कच्या वापराला नागरिकांकडून फाटा

परभणी : शहरातील सार्वजनिक ठिकाणी अनेक नागरिक मास्कचा वापर न करताच फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात नसल्याने हा प्रकार वाढला आहे. मनपा प्रशासनाने दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्हा सीमा हद्दीवर होईना तपासणी

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा सीमा हद्दीवर प्रवाशांची कटाक्षाने तपासणी केली जात होती. मात्र जिल्ह्याच्या सीमेवरील नाके विसर्जित केल्यानंतर या तपासणीला फाटा देण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून या तपासण्या पुन्हा सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Power outage in Deshmukh Hotel area overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.